९४ कुळी, ९६ कुळी नि OBC हे काय केवळ प्रचाराकरताच आहेत का ?

९४ कुळी, ९६ कुळी नि ओबीसी हे काय केवळ दक्षिणा देण्याकरिता, गुलामगिरी करण्याकरता ?

Ulhas Patil, shaym chavhan    04-Sep-2023
Total Views |
Maharashtra : Pune ;
दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने "सहस्त्र ब्राह्मण भोजन" ठेवले आहे.
म्हणजे फक्तं ब्राम्हण जातीच्या व्यक्तींनाच गणपती देवाचे पावित्र अन्न मिळणार आहे. हा खास भोज फक्त ब्रह्मवृंदा साठीच आहे.
हा जातीभेद, धर्मभेद का...?

९६ कुळी नि OBC हे काय केवळ प्रचाराकरताच आहे का 
पण संपुर्ण महाराष्ट्रातले बहुजन लोकही दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला श्रध्देने मानतात.
त्यात कायस्थ आले,देशमुख आले, मराठा आले, कुणबी आले, नाईक मराठा आले, कडू मराठा असे , मराठा समजणारे अनेक प्रकारचे बांधव आले, सुतार, शिंपी, कासार, लोहार , वाणी, सोनार, कुंभार, माळी, धनगर, गोसावी आगरी कोळी बांधव आले.
या सर्वांना गणेशाप्रती खूपच भक्तिभाव आहे.
 
आता तुम्ही पहालच सारे हिन्दू डोक्यावर पाट घेवुन त्यावर श्रींना घेवुन ढोल ताशाच्या गजरात सारा महाराष्ट्र दुमदुमून टाकतील.
मग दुःख याचेच वाटते आहे की या हिन्दू बांधवांना डावलून फक्तं वैदिकानांच
गणपतीच्या मानाच्या जेवणाचे निमंत्रण का...?
हा भेदभाव का?
 
तस म्हटलं तर वैदिक धर्माप्रमाणे ब्राम्हण हे पृथ्वीवरील भूदेव आहेत.
वैदीक आणि हिन्दु हे दोन स्वतंत्र धर्म आहेत.
वैदीक धर्मानुसार ब्राह्मणांनाच पवित्र भोज मिळतो.
त्यांच्या शास्त्रानुसार बहुजन हे शूद्र आहेत.
मग शूद्रांना पंक्तीला सोबत कसे बसविणार?
त्यांचेही त्यांच्या धर्मानुसार
बरोबर म्हणा!
परंतू हा भेदाभेद मला तरी आवडलेला नाही.
कारण आता संविधानाचे राज्य आहे.
 
अगदी पेशवाईची आठवण झाली. पेशवाईत अशीच ब्राम्हण लक्षभोजन सुरु असत. सुग्रास अन्नासोबत सोने हिरे यांच्या दक्षिणा असतं.
 
दुष्काळ असला तरी कुणब्या कडून कर वसूल केला जात असे आणि असे
ब्राम्हणभोज आयोजीत केले जात असत.ब्राम्हणासाठी रमणा ही होता. तो काहीं काळ इंग्रजानीही चालु ठेवला होता.
आमचे म्हणणे असे की हिन्दु बहुजनांना डावलून फक्त वैदीक ब्राम्हण यानाच अन्न प्रसादाचे निमंत्रण का...
हिन्दु बहुजन यांना का सामिल करुन घेत नाहीत.
हा भेदभाव नव्हें काय ?
 
या सुग्रास सहस्रब्राम्हण भोजाचे आयोजन करताना कोणते निकष लावले ते जाहीर झालं पाहिजे.
आता अजुन पेशवाई पद्धत का पाळली जात आहे त्याचेही उत्तर मिळाले पाहिजे.
वैदीकधर्मिय हिन्दु धर्मिय
लोकांवर हा सामजिक अन्याय का करीत आहेत.
आज या भारतात संविधानाचे समतेचे अधिराज्य आहे.
हे वैदीक लोक जाणूनबुजून
का विसरतात....?
 
अन्यथा हा सार्वजनिक ट्रस्ट भेदभाव करतो या कारणाने या ट्रस्ट विरोधात कोर्टात खटला भरावा लागेल. शुद्रातिशुद्र तिथे दानधर्म करायला, फुकट हमाल्या करायला आणि चरायला फुकटे वर्णवर्चस्ववादी जातीचे वैदिक हे चित्र सर्व बहुजनांनी समजून घ्यायला हवं. याला विरोध करायला हवा. वैदिकांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायला हवं.
 
जे ब्राह्मणेतर बाबा, महाराज वैदिक धर्म, वैदिक धर्म म्हणून नाचतात त्यांना यावरून वैदिक धर्मात आपली लायकी काय ते उमजायला हवे.
 
वैदिक, सनातनी धर्म आपल्याला माणूस मानत नाही. शूद्र मानतो, पशू मानतो हे समजून घ्यायला हवं. आपला धर्म हिन्दु धर्म आहे, वैदिक वा सनातनी धर्म नाही. दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलायचा धंदा बंद केला पाहिजे. आपला धर्म समजून घेतला पाहिजे. यासाठीच नामदेव महाराज, तुकाराम महाराज नव्याने अभ्यासले पाहिजेत.
वैदिकांच्या नादी लागून मुसलमान आणि बौद्धांच्या विरोधात तलवारी काढून दंगली घडविणे थांबविले पाहिजे.
एका शुद्राने दुसर्या शुद्रावर अन्याय का करावा....?
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा जाहिर निषेध !!