नळ पाणीपुरवठा योजनांची कामे म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारू?

मिलिंद माने    29-Aug-2023
Total Views |
Raigad : Mahad ;
महाड तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारू भरून त्याला नव संजीवनी देण्याचा प्रयत्न चालू असून कागदोपत्री पाणीटंचाई दूर झाल्याचे दिसेल मात्र महिलांच्या डोक्यावरील हंडा काही उतरणार नसल्याचे चित्र चालू वर्षी मार्च महिन्यापासून बघण्यास मिळणार आहे.

नळ पाणीपुरवठा योजनांची कामे म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारू 
जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या एकेका ठेकेदाराला कमीत कमी 20 ते 25 योजनांची कामे मिळाली असून त्याच्याजवळ ही सर्व कामे एकाच वेळी चालू करण्यास लागणारे तांत्रिक यंत्रसामग्री तसेच अपेक्षित मनुष्यबळ नसल्याने मूळ ठेकेदाराने अनेक उप ठेकेदारांना वाटून त्यांच्याकडून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे मात्र उप ठेकेदारालाही पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नसल्याने अनेक गावातील नळ पाणी योजनेची कामे तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.
 
महाड तालुक्यात अनेक गावातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेमधील कामांमध्ये. सन 2020 21 मध्ये किंवा त्या त्या अगोदर मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल सारख्या पूर्वीच्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या साठवण टाक्या, पंप हाऊस, जॅकवेल ,तसेच जुन्या पाईपलाईन दाखवून ही कामे अनेक गावांमध्ये केली गेली आहेत.
महाड तालुक्यातील ज्या गावातील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,. तसेच गावातील सरपंच अथवा पक्षाच्या तालुका प्रतिनिधीने ही काम केली असून यापैकी एकालाही नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा पूर्व अनुभव नाहीये परिणामी ही कामे करताना अनेक योजनांच्या कामांमध्ये तांत्रिक चुका झाल्या आहेत.
 
जीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना देखील कोणत्याही प्रकारचा तांत्रिक अनुभव नसल्याने नवीन पाणी योजना होऊन देखील अनेक गावात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्या गेल्या मात्र त्यावर यथोचित तोडगा न काढता व त्यातील तांत्रिक चुका न काढता त्या चुका तशाच ठेवल्याने अनेक गावात भविष्यात मोठ्या प्रमाणावर वादाची चिन्हे घडण्याची शक्यता आहे तर काही गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे पाण्याचे उद्भव चुकीच्या ठिकाणी घेतल्याने मार्च नंतर त्यातील पाणी स्त्रोत्र गायब होऊन पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
 
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे चालू असताना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने व उपविभागीय अभियंत्यांनी किती वेळा व कधीही प्रत्यक्ष जागेवर न जातात कार्यालयात बसून पाणी योजनांचे अंदाजपत्रक बनविल्याने अनेक गावात या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण होणार असून भविष्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या पाणी योजना या कागदोपत्री पूर्ण झाल्याच्या दिसतील मात्र महिलांच्या डोक्यावरील हंडा मात्र जैसे थे राहण्याची चित्र सन 2024 च्या मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये पाहण्यास मिळणार आहे.
  • जनजीवन मिशन योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची नावे ठेकेदाराचे नाव व अंदाजीत रक्कम;
  • गवाडी नळ पाणीपुरवठा योजना22,47,609. गजराई कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर दीपक महानोरे साईनगर पोस्ट माणगाव.
  • वसाप नळ पाणीपुरवठा योजना42,91,946. सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनी प्रोप्रायटर गणी बाबासाहेब धामणकर मुक्काम पोस्ट पोलादपूर.
  • उगवत कोण नळ पाणीपुरवठा योजना95,49,063. सह्याद्री कंट्रक्शन कंपनी प्रोप्रायटर गणि बाबासाहेब धामणकर. मुक्काम पोस्ट पोलादपूर भेलोशी नळ पाणीपुरवठा योजना43,87,229. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर अभय महामुनकर मुक्काम लक्ष्मी अपार्टमेंट मारुती नाका अलिबाग.
  • कुरले नळ पाणीपुरवठा योजना1,27,89,586.. लौकिक संजय शिंदे मुक्काम पोस्ट मंगरूळ तालुका महाड.
  • चोचींदे नळ पाणीपुरवठा योजना1,07084,37. टीडी इंटरप्राईजेस प्रोप्रायटर तनवीर अन्वर देशमुख लोअर तुडील तालुका महाड.
  • वाळसुरे नळ पाणीपुरवठा योजना1,00,4063. अमर संजय जाधव मुक्काम मालेगाव तालुका बारामती.
  • पिंपळवाडी नळ पाणीपुरवठा योजना88,44,800. लौकिक संजय शिंदे पोस्ट मंगरूळ तालुका महाड.
  • काळीज नळ पाणीपुरवठा योजना94,91,113. अमर संजय जाधव मुक्काम मालेगाव तालुका बारामती.
  • मुळशी नळ पाणीपुरवठा योजना1,47,91,983.. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मझहर देशमुख मुक्काम नडगाव तालुका महाड.
  • कोजर नळ पाणीपुरवठा योजना2,10,86,97. सोहम कंट्रक्शन प्रोप्रायटर संजय नारायण तांडेल मुक्काम कासारभट पोस्ट साई तालुका पनवेल.
  • वाघोली नळ पाणीपुरवठा योजना77,22,643. देविदास संभाजी चव्हाण मुक्काम शाबई नगर तालुका खालापूर.
  • रामदास पठार नळ पाणीपुरवठा योजना1,11,76,436. समर्थक कृपा कन्स्ट्रक्शन कंपनी सांडवे तालुका महाड.
  • शिरवली नळ पाणीपुरवठा योजना1,82,37,091. हाय टेक इन्स्प्रास्ट्रक्चर मुक्काम २९१ कसबा पेठ शॉप नंबर पाच जिल्हा पुणे.
  • कावळे तर्फे विनहरे नळ पाणीपुरवठा योजना1,00,70,0938. हाय टेक इन्स्ट्रक्चर मुक्काम २९१ कसबा पेठ शॉप नंबर 5 जिल्हा पुणे.
  • कोठेरी नळ पाणीपुरवठा योजना1,78,61,237. श्री शेल शंकराप्पा आजगी मुक्काम शिव समर्थ नगर सरेकर आळी महाड
  • केतकीचा कोंड नळ पाणीपुरवठा योजना53,19,424. सतीश सुधाकर घरत मुक्काम पोस्ट थळ तालुका अलिबाग.
  • मोहपरे नळ पाणीपुरवठा योजना1,1085,479. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख मुक्काम नडगाव तालुका महाड.
  • दादली नळ पाणीपुरवठा योजना86,78,338. आदेश अनंत तुढीलकर मुक्काम पोस्ट पोलादपूर.
  • करंजखोल नळ पाणीपुरवठा योजना1,75,61,970. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मझहर देशमुख मुक्काम पोस्ट नडगाव तालुका महाड.
  • नेराव नळ पाणीपुरवठा योजना1,37,93,662. गजराई कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर दीपक महानुरे मुक्काम साईनगर तालुका माणगाव.
  • पांगारी नळ पाणीपुरवठा योजना1,060,47 97. गजराई कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर दीपक महानुरे मुक्काम साईनगर तालुका माणगाव.
  • नांदगाव बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजना95,17,382. गजराई कंट्रक्शन प्रोप्रायटर दीपक महानुरे मुक्काम साईनगर तालुका माणगाव.

  • बारसगाव नळ पाणी पुरवठा योजना97,33,510. शिरीष विलास कमाने मुक्काम पोस्ट मजगाव तालुका मुरुड जिल्हा रायगड.
  • कोळसे नळ पाणीपुरवठा योजना2,38 42,965. देविदास संभाजी चव्हाण मुक्काम साबाई नगर तालुका खालापूर.
  • सादोशी नळ पाणीपुरवठा योजना71,25,730. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर अभय महामुनकर मुक्काम लक्ष्मी अपार्टमेंट मारुती नाका अलिबाग.
  • निगडे नळ पाणीपुरवठा योजना1,9946,111. राज इंटरप्राईजेस प्रोप्रायटर विजय साळुंखे मुक्काम सरळ तालुका अलिबाग
  • धुरूप कोंड नळ पाणीपुरवठा योजना46,22,602. लौकिक संजय शिंदे मुक्काम पोस्ट मंगरूळ तालुका महाड.
  • कांबळे तर्फे बिरवाडी नळ पाणी पुरवठा योजना1,45 12,777. ऋतुजा श्रीकृष्ण घोडके मुक्काम सुपेपुर पोस्ट मांजरसुबा तालुका बीड.
  • गावडी नळ पाणीपुरवठा योजना39,62,444. श्री समर्थ कृपा कंस्ट्रक्शन मुक्काम चाडवे तालुका महाड.
  • दापोली नळ पाणीपुरवठा योजना84,17,421. वीरेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी अमेय घोलप मुक्काम पोस्ट समतानगर तालुका महाड.
  • निजामपूर नळ पाणीपुरवठा योजना74 17,022. साई कंट्रक्शन प्रोप्रायटर अभिजीत विठोबा म्हात्रे मुक्काम आमंत्रण बिल्डिंग प्लॉट नंबर 203 गोदावरी नगर पेण.
  • पारवाडी नळ पाणीपुरवठा योजना1,44,33,356. प्रतीक परशुराम शिंदे मुक्काम पोस्ट कोळकेवाडी पायरवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी.
  • आसन पोई नळ पाणी पुरवठा योजना92,96,610. एमडी इन्स्ट्रा स्ट्रक्चर मुक्काम बी ,8 ,. वेट रेसिडेन्सी भांगरवाडी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे.
  • आकले नळ पाणीपुरवठा योजना 58,91,393. आर एम कंट्रक्शन प्रोप्रायटर मझहर देशमुख मुक्काम नडगाव पोस्ट महाड
  • पारमाची नळ पाणीपुरवठा योजना 1,64,95,020. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मझहर देशमुख मुक्काम नडगाव तालुका महाड.
  • वाकी बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजना2,69,33,586. राज इंटरप्राईजेस प्रोप्रायटर विजय साळुंखे मुक्काम सारळ तालुका अलिबाग.
  • वाकी खुर्द नळ पाणीपुरवठा योजना47,27,214. तेजस सुभाष निकम मुक्काम बोरगाव पोस्ट मोहोत तालुका महाड.
  • पिंपळकोंड नळ पाणीपुरवठा योजना66,97,555. सह्याद्री कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर गणी बाबासाहेब धामणकर मुक्काम पोस्ट पोलादपूर.
  • मोहोत नळ पाणीपुरवठा योजना5,23,65,261. संदीप निवृत्ती सावंत मुक्काम पोस्ट फुलेवाडी तालुका कोल्हापूर.
  • साकडी नळ पाणीपुरवठा योजना88,14,904. शिरीष विलास कमाने मुक्काम पोस्ट मजगाव तालुका मुरुड.
  • गोठवली नळ पाणीपुरवठा योजना41,83,160. करण किशोर पाटील मुक्काम पोस्ट मातोश्री निवास शिवाजीनगर तालुका माणगाव.
  • गांधार पाले नळ पाणीपुरवठा योजना 2,53,55,476. श्रीशैल शंकराप्पा आजगी मुक्काम शिव समर्थ नगर सरेकर आळी तालुका महाड.
महाड तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे व त्यांची कामे प्रत्यक्षात चालू आहेत त्या योजनांच्या ठिकाणी पूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनांमधून कामे झाली होती व त्यातील काही कामांचा देखभाल दुरुस्ती अवधी संबंधित ठेकेदाराकडे असतानाही त्याच योजनांवरती जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे दाखवून व काही ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत देखील योजना झालेल्या आहेत व त्या चालू स्थितीत होत्या अशा योजनांवर सोपस्कार पार पाडण्याचे उद्योग पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाबरोबरच रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने करून व कोणत्याही योजनांच्या निविदा तालुका अथवा जिल्हा वृत्तपत्रात न देता व त्यावरील हरकती सूचना विचारात न घेता या योजनांची कामे चालू केल्याने भविष्यात या योजना सुस्थितीत चालू राहण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात पडण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र सन 2024 च्या मार्च व एप्रिल महिन्यात निवडणुकीच्या काळात पाहण्यास मिळणार आहे