समता फाउंडेशन मुंबई, मदतीसाठी पुढे !

पूरग्रस्त विद्यार्थ्यांनां स्पोर्टस् ड्रेसचे वाटप...

रोशन महादेव तायडे ८२६५०२०६७२    28-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Jalgoan ; 
२२ जुलै२०२३ च्या ढगफुटीने जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले.त्यात विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला वह्या, पुस्तके, दप्तर ,कपडे पुराच्या पाण्यात वाहून व भिजवून गेल्यामुळे न भरून येणारे नुकसान झाले.

समता फाउंडेशन मुंबई, मदतीसाठी पुढे 
 
यांची जाणीव ठेवणाऱ्या संस्थानी पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तकं, दप्तरं, कपडे उपलब्ध करून देण्याची गरज असते. त्यांची जाणीव ठेवून श्री सागर रामभाऊ तायडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या मातृभूमी गाडेगांव खुर्द ता.जळगांव जामोद येथे लहानाचे मोठे झाले, त्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण घेतले त्या गावात गेली चाळीस वर्षात असा पूर कधीच आला नव्हता. त्या प्रचंड ढगफुटीमुळे गावात २२ जुलैला महापूर आला त्यामुळे अनेकांचे घर पाण्याखाली गेले.
 
घरातील सर्व संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तू गाळात खराब झाल्या.गाडेगांव खुर्दातील परिस्थितीची बातमी जेव्हा कानावर पडली तेव्हा तात्काळ गावातील श्री रोशन महादेव तायडे पुतण्या याला सांगून मुख्याध्यापक शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्य गरज काय आहे ह्याची पडताळणी केल्या नंतर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील 230 विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्टस् ड्रेसचे वाटप समता फाऊंडेशन मुंबई अध्यक्ष ऍड प्रमोद सागर तायडे व प्रमुख मार्गदर्शक सागर रामभाऊ तायडे ह्याच्या वतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी २३० विद्यार्थ्यांना स्पोर्टस् ड्रेसचे वाटप करण्यात आले, यावेळी जेष्ठ बंधू आंबेडकरी चळवळीचे रिपब्लिकन नेते मान.पी.एस.तायडे,महादेव तायडे बौद्धाचार्य,सागर तायडे,दादाराव तायडे,प्रशांत तायडे,मुख्याध्यापिका श्रीमती आशा ईश्वरे मॅडम,श्री गजानन काकडे तालुका संपर्क प्रमुख शिक्षक सेना, सर्व शिक्षक वॄंद,ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती समिती,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते गणवेष वाटप करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
 
सदर कार्यक्रमाला गाडेगाव खुर्द सरपंच सौ.रुपलीताई संजय भारसाकळे, उपसरपंच श्री.दत्ताभाऊ विठ्ठलराव खुपसे,ग्रामपंचायत सदस्य सर्व श्री.प्रविण रोजतकार,ललिताबाई सावळे,गजानन पांडे,राहुल फाडे,गणेश बावस्कर,अशोक बावस्कर,आकोला खुर्द सरपंच सौ.ताईबाई वसंतराव बोदडे, तंटामुक्ती समितीचे बाळूभाऊ शिवशंकर कराळे,श्री अॅड.शिवकुमार खुपसे,निलेश खुपसे,समाधान गायकवाड,या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी आणि आजचे प्रसिद्ध पत्रकार साहित्यिक,कामगार नेते सागर रामभाऊ तायडे यांचे सर्व शिक्षक वर्गाने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.
 
श्रीमती आशा ईश्वरे मुख्याध्यापिका,श्री.विठ्ठल के वाघमारे,सौ.वैशाली एस हिस्सल, श्री.गजानन काकडे,सौ.वैशाली हिस्सल मॅडम, श्री.संदीप जी सोळंके,श्री.पंकज आर जगताप, श्री.गंगाप्रसाद जी बक्कावाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.मोहन महादेव डाबेराव, उपाध्यक्ष श्री.धम्मपाल उदेभान तायडे,सन्मानीय सदस्य श्री.अशोक श्रीकृष्ण बावस्कर,श्री.राजेंद्र शेषराव चोपडे,मोहन ओंकार वानखडे,अर्जुन साखराजी तायडे,तेजराव गणपत इंगळे,प्रदीप देविदास तायडे,विजय रामकृष्णा तायडे, भिमराव वासुदेव सावळे, वसंता बोदडे,ओंकार हेलोडे, विश्वनाथ मानकर,विजय हळे,राजू हरणे,भागवत मुंडे,भिमराव वामन तायडे,उत्तम कैलास तायडे,सुनील सदाशिव तायडे,मधुकर शिरसाट, गणेश वाडेकर,राजेश चंदनगोळे, रामकृष्णा हिंगणकर,पंकज ठाकूर, प्रल्हाद वाघ,भागवत लाहुडकर, गोपाल रमेश खुपसे, लक्ष्मण घोपे, बाळूभाऊ घोंगे,कल्पना भगवान सावळे,अनिता रमेश खुपसे सह जागरूक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
गजानन काकडे सर, पंकज जगताप सर,अर्जुन वामन तायडे,प्रदीप देविदास तायडे,मंगेश रामकृष्णा तायडे आणि रोशन महादेव तायडे यांनी नांदुरा येथे दुकानात जाऊन जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील 230 विद्यार्थ्यांना शालेयस्पोर्टस् ड्रेस मिळविण्यासाठी तीन दिवस विशेष मेहनत घेतली.त्याबद्ल प्रशांत सागर तायडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.पंकज आर जगताप सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री गजानन काकडे सर यांनी केले.