कुणबी समाजाला - आ, कथोरे ठरले कु-हांडीचा दांडा गोतास काळ,,,,

जिल्हा भरातील तमाम कुणबी कार्यकर्त्याचा एल्गार मुरबाडात कथोरेच्या वाईट प्रवृतीचा विरो़ध भाजपाच्या मुळावर या पराभवात खारीचा वाटा उचलू या ! !!! - - कथनी आणी करणीतील फरक ओळखून कृतघ्न विषवल्ली विरोधात कुणबी एकवटले,,,,,

जनदूत टिम    27-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Thane 
कुणबी समाजाला - आ, कथोरे ठरले कु-हांडीचा दांडा गोतास काळ,,,,
 
अखेर वापरा व फेकाची निती आली अंगलट,,,
 
जिल्हा भरातील तमाम कुणबी कार्यकर्त्याचा एल्गार मुरबाडात कथोरेच्या वाईट प्रवृतीचा विरो़ध भाजपाच्या मुळावर या पराभवात खारीचा वाटा उचलू या ! !!! - -
कथनी आणी करणीतील फरक ओळखून कृतघ्न विषवल्ली विरोधात कुणबी एकवटले,,,,,
 
कुणबी समाजाला - आ, कथोरे ठरले कु-हांडीचा दांडा गोतास काळ,,,,
दि २४ रोजी भिवंडी येथे मधुकर मोहपे, योगेश पाटिल यांच्या नैतृत्वाखाली जिल्हाभरातील कुणबी समाजातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्ये, समाजसेवक एकत्र येत समाजतील कृतघ्न विषवल्ली समजले जाणारे आ कथोरे हे समाजात अपप्रचार व द्वेष पसरवून स्वताचा स्वार्थ सा़धून घेताना समाज व जातीचं भांडवल करून आपली पोळी भाजून घेताना समाजात आंतर्गत भांडण लावून माणसं संपविण्याचा एक कलमी कार्यक्रम करीत असल्याचे वास्तव समोर येऊ लागल्याने आ कथोरेच्या निषेधार्थ शेकडो समाजबांधवांचा एकजूट कार्यक्रम पार पडला.
 
सन २००९च्या विधानसभा निवडणूकीत तत्कालीन आ गोटिराम पवार यांना भरल्या ताटावरू उठवले मुरबाडची उमेदवारी घेतली त्या वेळेस त्यांच्या सोबत कोणताही स्वार्थ नसलेले कुणबी नेते तन मन धन वापरून काम करणा-यांनी त्यांना निवडून देताच त्यांना पहिले संपविण्याचं काम केले यांच वास्तव समाजिक कार्यकर्ते, बबन हरणे यांनी या कार्यक्रमात आमदार कथोरेंच्या पापाचा जाहीर पाडा वाचताना सांगितले की,,, समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कथोरे हे समाज बांधवांना गावातील सामाजिक कामासठीचं सभामंंडप किवा लग्नकार्यासाठी अवश्यक असा हा़ॅल ,आज पर्यत कुठं हि दिल गेलं नाही, या कृतघ्न माणसाने समाजाच्या कामासाठी पदरमोड करून पाच रुपये वर्गणी देखील कधी कुणाला न देणा-या या आमदारांनी समाजातील मोठी केलेली दोन माणसे दाखवा, नाही तर त्यांनी संपविलेली अनेक कुंटूंबे ते दहा माणंस संपविल्यांची पुराव्यासह जाहिर व्यासपिठावर हजर करतो, राजकारणाच्या जागेवर राजकारण जरूर करावे? परंतु कथोरे हे समाजात द्वैष निर्माण करीत कायम तेढवाढवून समाजातील चांगली माणसं संपवित असल्यांंचा संताप बबन हरणे यांनी व्याक्त केला, तर यांचा सोबत तन मन धना ने काम करणारे मधुकर मोहपे, बबन हरणे, सुधीर राऊत,मधुकर घुढे,संजय हंडोरे-पाटिल हि जिवंत उदाहरण आहेत, ज्यो स्वकियांचा(घरच्यांचा)झाला नाही तो तुमचा आमचा काय होईल हा जाहिर घणाघात हरणे सह अनेकांनी जाहिर करीत भाजपात देखील धड राहत नसल्याने येथील भाजपा गच्छन्ती सुरू झाली, उंबरठ्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणूकांत मूरबाडांतील भाजपाच्या पराभवाला खारीचा वाटा म्हणून आपण सर्वानी निर्धार करू हा मनोदय जमलेल्या शेकडो कुणबी बांधवानी जाहिररित्या व्याक्त केला,
कुणबी समाजाला - आ, कथोरे ठरले कु-हांडीचा दांडा गोतास काळ,,,, 
सन २०-२१ कोरोनाच्या अडीच वर्षाच्या कठिण काळात कार्यकर्त्यानां नागरिकांना वाऱ्यावर सोडून मतलबी राजकारण करणाऱ्या तालुका भाजपाची गच्छंती सुरू झाल्या सारखी परिस्थिती दिसून येत, या महामारीनं नागरिकांना मतदारांना आपलं कोण व परका कोण ? ह्याची खरी जाणीव करून दिली, पक्षीय सतरंज्या उचलण्यात आयुष्य वाया घालविण्या ऐवजी गावोगावातील सुशिक्षीत तरूणाईनं स्वयंरोजगार शोधून आजच्या घडीला गावाच्या वेशीलगत,हायवेच्या कडेला वाडापावचहा टप-या,चायनिजहातगाड्या,कटलरी दुकान, ईस्त्रीचा व्यावसाय,चिकण मटण सुकीमच्छी,ओलीमच्छी अशी प्रत्येकांच्या पात्रते नुसार व्यावसाय सुरू करूण आपल्या प्रंपचाची धुरा खांद्यावर घेतल्याने हाताला काम मिळाल्याने अपसुकच या तरूणांनी, नागरिकांनी,आपल्याया छोट्याशा कां होईना व्यावसायात स्वताला गुंतवून घेतल्याने या तरूणांच्या जिवावर चालणारी राजकिय दुकानदारीला चांगलाच चाप बसल्याचे दिसून येते. 
 
विशेष म्हणजे तसं पाहता गावोगावी अद्यापही राष्टवादि,काॅग्रेस,शिवसैनेचे खानदांनी कार्यकर्ते पिढ्यांन पिढ्या सक्रिय असल्यांने हे पक्ष सत्तेत बहूमतात नसले तरी गावोगावी टिकून आहेत, व त्यात्या पक्षातील निष्टवंत जून्याजाणत्या कार्यकर्त्याचे सबंध हे पक्षीय वरिष्टासोबत घरोब्यासारखे असल्याने किती ही स्थित्यांतर झाली तरी पक्ष टिकून राहिले आहेत, मा़त्र या पैक्षा वेगळी अवस्था भाजपाची पहावयास मिळत असून एकेकाळी पडत्या काळात तालुक्यातील भाजपा ज्यांनी टिकवून ठेवली ,त्यांना सन २००९ च्या सत्तेच्या मेघा भरतीत ती भाजपा विसर्जित झाली,अडगळीत फेकली गेली, रस्त्यावर आंदोलन मोर्चे काढणारी भाजपा सत्ताधारीत येताच जनसंघाची भाजपा ठेकेदारीची सत्तेची भाजपा झाली. मुळ भाजपाची तत्वच अडगळीत गेली, व राष्टवादि ,काॅग्रेस, शिवसेना,इतरांची घर फोडून ज्या भाजपाला वाढल्याची 'सुज' आली ती सुज कोरोना महामारी पासून ओसरू लागली असल्याचे सध्याचं चित्र पाहता,"वापरा व फेकून द्या" ने केलेल्या कर्माची परत फेड होत असल्याचे चित्र दिसून येतंय, तसही गावोगावी भाजपा नगण्यमात्र असतानाच, तालुक्यात कोरोना महामरीत आपलं कोण परक कोण हे शिकायला मिळाल्याने मतलबी संधीसाधुचा खरा मुखवटा जनते समोर आल्याची जळजळीत प्रतिक्रिया देताना माणसाने देखील तीच कर्म करावीत ज्या कर्माची परत फेड होताना पश्चताप होणार नाही. हि जळजळीत प्रतिक्रीयी पंसं चे माजी सदश्य व अभ्यासू पत्रकार शाम राऊतांनी दिली !