अभ्यासाच्या मानसिक तणावामुळे शालेय मुलीचा मृत्यू !

सकाळी ८ ते ३ शाळा, दुपारी ४ ते ७ टयुशन, रात्री होमवर्क अतितणावाने नववीच्या मुळीचा हृदयविकाराने मृत्यू !

जनदूत टिम    02-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Beed ;
आपली मूल शिकून मोठी व्हावीत ही स्वप्न प्रत्येक पालकाचं असत. परंतु जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्याला दिवसभराची शाळा, कोचिंग क्लासेस आणि उरलेल्या वेळेत होमवर्क यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक प्रचंड टन येत आहे.

अभ्यासाच्या तणावामुळे शालेय मुळीचा हृदयविकाराने मृत्यू 
 
अशाच ताणतणावातून बीड शहरातील एक प्राध्यापकाच्या नववीत शिकत असलेल्या मुलीच्या शाळेत वर्गात डेस्कवर बसलेली असतांना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अभ्यासाच्या धास्तीने शारीरिक नुकसान आणि प्रचंड मानसिक तनाव यामुळे हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. माझ्या मुलीच्या संधर्भात जि दुर्दैवी घटना घडली ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशी कळकळीची प्रतिक्रिया मुलीच्या वडीलाने बोलताना व्यक्त केली आहे. यातून आपल्या पाल्यांना मशीन प्रमाणे शिक्षणाची दैनंदिनी पर पडायला लावणाऱ्या पालकांनो गंभीर होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
 
  • विद्यार्थ्यांना ताण देऊ नका...
दोन दिवसापूर्वी बीड शहरातील बाशीरगंज भागातील प्राध्यापकाची मुलगी शेख रमशा एरफाण शिकत होती, शुक्रवारी सकाळी ती नेहमी प्रमाणे शाळेत गेली, वर्गात पहिल्याच डेस्क वर बसलेली असताना ११.३० वाजण्याच्या सुमारास तिने तिने डेस्क वर मान टाकली. तिला तत्काल खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. या संधर्भात मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या घटनेला दुजोरा दिला. शाळा, क्लासेस, होमवर्क सक्ती, रविवारी सुट्टी नाही. यामुळे मुलांच्या शारीरिक क्षमतेवरही याचा परिणाम होतो. अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे. होमवर्क झाले पाहिजे, सकाळी लवकर उठुण शाळेत गेले पाहिजे, क्लासेस ला वेळेच्या आत पोहचले पाहिजे हा मानसिक तनाव असतो.
 
त्यामुळे विदयार्थी प्रचंड तणावाखाली या विधी पार पाडत असतो. सकाळी ७ ते ३ शाळा दुपारी क्लासेस रात्री होमवर्क,यामुळे झोप देखील पूर्ण होत नाही. मानसिक दृष्ट्या मुलांना ८ ते ९ तास झोप मिळणे गरजेचे असते. त्यात हि मुलगी रात्री १ वाजेपर्यंत होमवर्क करत असायची. त्यामुळे तिच्यावर खूप ताण असेल ास् स्पष्ट होतंय. तरी आपल्या मुलांना खूप तणावाखाली ठेऊ नाक अशी विनंती तिच्या वडिलांनी बोलताना केली.
  • तुमची मुलं, मुली मशीन नाहीत...
सकाळी झोपेतून उठले की आवराआवर. शाळेतून येत नाही तोच क्लासेसला जाण्याची घाई, तिथून आले की जेवण करून लगेच होमवर्कला बसायचे. त्याच बरोबर अभ्यासाच्या शाळयबाह्य व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेचीही तयारी कारायहकी. सबीएसई, स्टेटबोर्ड विविध पुस्तके त्याच्यासमोर आणायची आणि त्यांना अभ्यासाची सक्ती करायची. प्रत्येक वेळी हे कर ते कर अभ्यासाला बस अशी सक्ती केली जाते. यामुळे विद्यार्थी जास्त तनावात येत असून यातून असे प्रकार वाढू लागले आहेत, तरी वेळीच सावध रहा.