Bhiwandi : कांचनताई राऊत पोलीस पाटील आतकोली यांच्या प्रयत्नांमुळे अवैध खाणकामांवर कारवाई...

जनदूत टिम    19-Aug-2023
Total Views |
Thane : Bhiwandi ;
गेली दोन दशके शासनाचा शेकडो कोटींचा महसूल बुडवून, शासनाच्याच शेकडो एकर जमीनीवर अवैध खाणकाम करणार्यांच्या अखेरिस मुस्क्या आवळण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

कांचनताई राऊत पोलीस पाटील आतकोली 
 
आतकोली परिसरातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. कारवाई दरम्यान सहा पोकलेन, तीन ट्रॅक्टर व दोन कम्प्रेसर अशा एकूण एक करोड दोन लाख किंमतीच्या मशनरी ताब्यात घेण्यात आल्या असून,पंचनामा करून, बारकू बाळू राऊत राहणार आतकोली, अनिल राऊत राहणार आतकोली व गणपत मते राहणार शिरोळे यांच्यावर कलम ३७९, ५११ व ३४ अन्वये पडघा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कांचनताई राऊत पोलीस पाटील आतकोली 
 
कारवाईच्या वेळी ह्या विभागाचे मंडल अधिकारी संतोष अगीवले, तलाठी रोहन पवार, भिवंडी तालुक्याचे तहसीलदार अधिक पाटील, जिल्हाधिकारी दक्षता पथक, पडघा पोलिस, आतकोली गावच्या पोलिस पाटील कांचन राऊत, ग्रामसेवक विलास पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. ह्या कारवाई मुळे खाण माफियांचे धाबे दणाणले असून, यापुढे आतकोली परिसरात अवैध उत्खनन होणार नाही असा विश्वास गावकऱ्यांनी यांनी व्यक्त केला आहे, तसेच गेल्या दोन दशकांपासून होणार्या जाचातून मुक्तता केल्यामुळे गावकऱ्यांनी समाज सेवक दिनेश बेलकरे यांचे आभार मानले आहेत. ह्या शासकीय भूखंडावरील अवैध खाणकामांमुळे उत्खनन करण्यात आलेल्या क्षेत्राची मोजणी करून, बुडालेला शासनाचा शोकडो कोटिंचा महसूल आरोपींकडून वसुल करण्यात यावा अशी मागणी ही जोर धरू लागली आहे.