Kasane : विद्यार्थी सन्मान कार्यक्रम संपन्न करून स्वातंत्र्यदिन साजरा झाला...

भास्कर भोईर    17-Aug-2023
Total Views |
Bhiwandi : Kasane ; 
सालाबाद प्रमाणे यावर्षीही कासणे येथे शिक्षणप्रेमी श्री भास्कर भोईर आयोजित दहावी, बारावी, पदवी तसेच विविध शाखेतून गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सन्मान करण्यात आला.

विद्यार्थी सन्मान कार्यक्रम संपन्न
 
तळागाळातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करून, तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

विद्यार्थी सन्मान कार्यक्रम संपन्न 
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मिलिटरी रिटायर्ड कॅप्टन सुभाष सिंग वर्मा, उद्योजक, श्री नारायण जाधव, शिक्षण क्षेत्रातले उच्चपदस्थ सौ युगंधरा पाटील, कॉम्प्युटर क्षेत्रातले मार्गदर्शक श्री विनायक पवार साहेब, आयबीएन लोकमतचे असोसिएट एडिटर्स किशोर दळवी, गावचे सरपंच श्री अजय घाटाळ,उपसरपंच श्री शरद गगे, पोलीस पाटील सौ. जान्हवी भोईर,उद्योजक श्री भगवान भोईर, श्रीराम मित्र मंडळ अध्यक्ष श्री अनिल शेठ मानिवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी या परिसरातून एम एस सी बरोबर सेटची परीक्षा पास झालेल्या कु. सायली संदीप जाधव हीचा विशेष सन्मान करण्यात आला, तसेच महाराष्ट्राच्या राज्यपाला हस्ते सन्मान केलेल्या कु. स्नेहा बिडवी हीचीही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक सौ प्रिया मेस्त्री मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन श्री सचिन गोंधळी यांनी केले.
 
गेल्या १२ वर्षे विद्यार्थी सन्मान कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनातून रोजगार व स्वयंरोजगारासाठी भविष्यातील शैक्षणिक मार्ग निवडणे सोपे होते.