मोडकळीस पुल "सावित्री" च्या वाटेवर ; काळू नदीवरील संगम पूलाला डागडुजीची गरज !

बुरुजांतून उगवली वड-पिंपळाची झाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अँन्युइटीकडे बोट !

जनदूत टिम    17-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Murbad ; 
मुरबाड-शहापूर तालुक्यातून नगर, कर्जत-खोपोली, जेएनपीटी या महत्वाच्या महामार्गांंवर जाण्यासाठी सध्या उपलब्ध असलेला एकमेव पुल अशी ओळख असलेला काळू नदीवरील संगमचा पूल प्रशासन व शासनाच्या दुर्लक्षामुळे धोकेदायक बनुन शेवटच्या घटका मोजीत आहे.

काळू नदीवरील संगम पूलाला डागडुजीची गरज 
ढासळणारे कठडे, कठड्या लगत भिंतीना पडलेल्या इंच इंच भेगा, गंजलेल्या सळया आणि पायाच्या बुरुजांवर वाढलेली वड-पिंपळाची झाडे या पूलाची महाड मधील सावित्री पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही देखभाल दुरूस्ती अभावी जर्जर झालेला हा पुल मोठ्या अपघाताला निमंत्रण ठरणार आहे , ५५ वर्षे जुन्या असलेल्या या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेकामी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

काळू नदीवरील संगम पूलाला डागडुजीची गरज 
मुरबाड-शहापुर या दोन तालुक्यांना जोडणारा, शाई-काळू व डोईफोडी या नद्यांच्या संगमावर श्रीक्षेत्र संगमेश्वर येथे १९६३ मध्ये या दोन तालुक्यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. प्रत्येकी ६० मीटर लांबीच्या ८ कमानी असलेल्या या पुलाची एकूण लांबी ५५२ मीटर इतकी असून पुलावरील रस्ता २२ मीटर व पुलाची नदीपात्रापासून उंची ४५ मीटर आहे.१९६० ते १९६३ अशी तीन वर्षे चाललेल्या या महाकाय पुलासाठी त्यावेळी ५ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आला होता.तत्कालिन मुख्यमंत्री मारोतराव शा.कन्नमवार यांनी १० जून १९६३ ला उद्घाटन केल्यापासून या पुलाच्या देखभालीची जबाबदारी शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे आहे. दरवर्षी पावसाळ्यात व उन्हाळ्यात पुलाच्या मुख्य बुरुजांवर उगवलेली झाडे झुडपे काढून पुलाच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

काळू नदीवरील संगम पूलाला डागडुजीची गरज 
कित्येक वर्षे पुलाच्या देखभालीकडे लक्ष दिले गेलेचं नसल्याने पुलाच्या पायाच्या मुख्य बुरुजांवर वड, पिंपळ यांसारखी मजबूत खोड असलेली झाडे उगवून त्यांची चांगलीच वाढ झालेली आहे. या झाडांची मूळे खोलवर गेल्याने पुलाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला असून पिलर लगत चारचार इंचाच्या भेगा पडल्या असल्याने पावसाळ्यात काळू नदीला येणा-या महापूरात किंवा सततच्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .शहापूर शेंद्रूणमार्गे मुरबाड या राज्य मार्गाव खड्डयांच सामराज्य असल्याने सध्या शहापूर किन्हवलीमार्गे मुरबाड या प्र.जि.मा.क्र.६३ वरील भार वाढलेला असतांना कर्जत-खोपोली, माळशेज, मुरबाड एमआयडीसी या दिशेने जाणारी अवजड वाहनेही या पुलावरुन जात आहेत.अशा परिस्थितीत या पुलाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
 
विशेष म्हणजे महाड पूलाच्या दुर्घटनेनंतर शासनाने सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिलेले असतानाही या मुरबाड -शहापूर तालुक्यातील संगम पुलाचे ५५ वर्षांनंतरही ऑडीट झालेले नाही. मे २०२० मध्ये एका वनराई बंधाऱ्याच्या लोकार्पणानिमीत्त पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी या पुलाला भेट देवून पूलाचे ऑडिट करण्याचे निर्देश अधिका-यांना दिले होते.मात्र प्रत्यक्षात त्याबाबत कुठली कार्यवाही झाल्याचे ऐकण्यात नाही.दरम्यान सध्या हा पूल अँन्युइटी हायब्रीडचा ठेका घेतलेल्या गुजरातस्थित कंपनीकडे असून त्यांनी या योजनेअंतर्गत दुरुस्ती ऐवजी पुलाला कलर लावुन कलरच्या माध्यामातुन जनतेची दिशाभुल चालवली आहे वरवर जरी कलरलावला असला तरी पुलाला खाली पडलेल्या भेगा चिरा एकदिवस रंक्तरंजित कलर लाविल यात शंकाच नाही पुलाची देखभाल दुरूस्ती सांबां विभाग शहापुर यांच्या कडे नसल्याने गुजरातच्या त्या कंपनीला ईकडे लक्ष देण्यास वेळ असती तर पडलेल्या भेगा चिरा वर उपाय योजना केली असती , मिलन रोड बिल्डटेकच्या माणसांकडून बुरुजांवर वाढलेली झाडे येत्या दोन दिवसांत काढून टाकू असे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून सांगण्यात येत असले तरी वाढलेल्या झाडांची पान तोडणे म्हणजेच दुरूस्ती होत नाही हे हि येथील उच्चशिक्षीत अभिंयत्याना कळत नसेल तर ती वाहन चालक व प्रवांशीसाठी शोकांती का म्हणावी लागेल. 
 
हा कायम धोकादायक बनलेल्या पुलाच्या नविनबांधकामा बाबत किमान ९ कोटी खर्च अपेक्षीत असून या बाबत बांधकाम मंत्री व मुख्यमंत्र्याना भेटून या पुलासाठी निधी उपलब्ध करण्याचा पाठपुरावा केला जाईल शिवसैना माजी आमदार --पांडूरंग बरोरा यांनी दै,जनदूत शी बोलतांना सांगितले.