लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा माधव तर पवारांचा मराठा माळी बहुजन फॉर्मुला !

मिलिंद माने    17-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ;
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा ,काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांची शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी ,व मनसे,. छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष तर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना . चंद्रशेखर राव यांचा बी .आर .एस पक्ष., केजरीवालांचा आम आदमी पक्ष यासह सर्वच पक्षांनी आपली मोर्चे बांधणी चालू केली असली तरी भाजपाचा माधव तर पवारांचा मराठा माळी बहुजन फार्मूला या निवडणुकीत रंगतदार ठरणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा माधव तर पवारांचा मराठा माळी बहुजन फॉर्मुला
 
महाविकास आघाडी. सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर वर्षभरानंतर पुन्हा महाविकास आघाडी मध्ये फूट पडल्यावर सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत त्यातच भाजपाने महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून सन 80 च्या दशकात भाजपाने वापरलेला माधव फार्मूला म्हणजे माळी ,धनगर ,आणि वंजारी,( बंजारा) हे वर्ग ओबीसी समुदायातली असून या वर्गाला खुश करण्यासाठी अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा माधव तर पवारांचा मराठा माळी बहुजन फॉर्मुला 
 
अहिल्यादेवी होळकर या साहस ,परोपकार, आणि धार्मिक कार्याच्या प्रतीक . आहेत धनगर समाज त्यांची देवाप्रमाणे पूजा करतो राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे अकोला परभणी नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यात धनगर समाजाचे प्राबल्य आहे राज्यातील जवळपास 100 विधानसभा मतदारसंघात धनगर समाज विस्तुरलेला आहे तर चाळीसहून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये या समाजाची मते निवडणुकीत विजयासाठी निर्णय ठरतात.
 
भाजपाचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सन 2014 स* धनगर माळी आणि बंजारा नेत्यांच्या युतीसाठी अथक प्रयत्न केले होते त्याचा फायदा सन 2014 च्या निवडणुकीत भाजपाला चांगल्या पद्धतीने झाला सन 2014 च्या जाहीरनाम्यात भाजपाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन भाजपाने पूर्ण केले नाही त्या ऐवजी धनगर नेते आणि मुंडे कुटुंबीयांचे निकटवर्ती असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन धनगर समाजाला शांत करण्याचा प्रयत्न भाजपाने त्यावेळी केला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा माधव तर पवारांचा मराठा माळी बहुजन फॉर्मुला 
 
माधव फार्मूला वसंतराव भागवत यांचे सूत्र ;
.........................
सन 1980 स* भाजपाची स्थापना झाली त्यावेळी हा पक्ष ब्राह्मणांचा व उच्च वर्णीय सुशिक्षितांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा त्याचवेळी 1980 च्या सुमारास मराठा समाजाला धरून राज्यात काँग्रेस सत्तेत आला त्यामुळे मराठा समाजाला धरून आपल्या पक्षाचे हित होणार नाही हे भाजप नेत्यांना कळून चुकले होते त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा बहुजन समाजाकडे वळवला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांनी भाजपा हा उच्चवर्णीय सुशिक्षित व्यक्तींचा नेतृत्व असलेला पक्ष म्हणून ओळखला जात असला तरी पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी व मतांचे राजकारण सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी राज्यात माधव पॅटर्न अमलात आणला त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, महादेव शिवणकर,. यांना सोबतीला घेऊन (माळी, धनगर, वंजारी) यांची मोट बांधून माधव पॅटर्न यशस्वीरित्या राबविला होता.
 
महाराष्ट्र जवळील कर्नाटक राज्यातील भाजपाच्या पराभवानंतर भाजपाच्या केंद्रीय तसेच राज्याच्या नेतृत्वाचे डोळे उघडले असून लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात काही जागांवर पराभवाचा सामना करावा लागणार आहे त्याची कसर भरून काढण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघावर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे त्यासाठी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले आहे तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना देखील राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तर तर अतुल सावे यांच्याकडे देखील मंत्रीपद ठेवून ओबीसी समाजाकडे प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
भाजपाच्या माधव फार्मूलावर
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वयाचा विचार न करता महाराष्ट्रात मराठा माळी व बहुजन फार्मूला तसेच मुस्लिम नेत्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले आहेत त्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रापासून त्यांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून मराठवाडा व विदर्भातील काही मराठा व माळी व बहुजन समाजाचे प्राबल्य असणाऱ्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. स्वर्गीय गिरीश बापट यांचा पुणे लोकसभा मतदारसंघावर देखील लक्ष केंद्रित केल् असून वेळ पडल्यास या मतदारसंघात सुप्रिया सुळे किंवा पार्थ पवार यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शकतात
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे जय सिद्धेश्वर स्वामी यांना पराभूत करण्यासाठी वेळ पडल्यास प्रणिती शिंदे यांना जाहीर रित्या पाठिंबा देण्यास पवार मागे पुढे पाहणार नाहीत.
 
माढा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून पवारांचा राहिला होता मात्र या लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचे प्राबल्य असून या मतदारसंघातील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी पवारांनी नुकतीच विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व हा मतदारसंघ पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांच्या रणनीती नुसार पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीकडे खेचून आणू शकतील.
 
सांगली लोकसभा मतदारसंघातील संजय काका पाटील यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये राहिलेल्या आमदाराचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी शरद पवार हे आर आर पाटील यांच्या पत्नी या विद्यमान आमदार आहेत तर यांची कन्या सुप्रिया पाटील किंवा आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना निवडणुकीत उतरवू शकतात तर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील माने हे दोन्ही शिवसेनेचे खासदार शिंदे गटाकडे गेल्याने त्यांना निवडणुकीत पराभवाची धूळ चारण्यासाठी शरद पवार हे त्या ठिकाणी काँग्रेसचे सत्यजित पाटील यांच्या प्रयत्नाने मराठा कार्ड खेळून या दोन्ही उमेदवारांना पराभूत करण्याची रणनीती आखात आहे.
 
नाशिक जिल्ह्यात मराठा समाजाबरोबरच माळी समाजाचे मोठे प्राबल्य आहे या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या भारती पवार या केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले हेमंत गोडसे यां नाशिक लोकसभा मतदारसंघातील खासदाराचा पराभव करण्यासाठी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ते भुजबळांच्या माळी समाजाला हाताशी धरून या दोन्ही जागा प्रस्थापित करू शकतात
जळगाव जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा असून दोन्ही जागांवर भाजपाचे खासदार आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेश पाटील तर रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे हे भाजपाचे दोन खासदार आहेत मात्र एकनाथराव खडसे हे मराठा समाजाच्या असून सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आहे. एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघावर शरद पवार धुर्त खेळी करून हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणण्यात यशस्वी होऊ शकतात
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडा नंतर शरद पवारांना सोडून गेलेले व अजित पवार यांच्या बरोबर असलेले परंतु अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांना रायगड लोकसभा मतदारसंघात शरद पवार हे धक्का तंत्र देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे तटकरे हे पुन्हा लोकसभा निवडणुकीत उभे राहिल्यास शेकाप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाकडून तसेच या मतदारसंघातील मुस्लिम समाजाचे प्राबल्य लक्षात घेता शरद पवार हे तटकरे यांना पवार धक्का तंत्र वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सर्वकाही देऊन घरातील दोन्ही मुलांना आमदार करून देखील सुनील तटकरे यांनी शरद पवारांची साथ अचानक सोडल्याने त्यांना कायमस्वरूपी धडा शिकवण्याची व्यूहरचना पवार यांनी आपल्या जी चर्चा ऐकण्यास मिळत आहे त्याच प्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडे गेल्याने तसेच या मतदारसंघात मागील वेळेस पार्थ पवार यांचा पराभव अजित पवार व शरद पवार यांचा जिव्हारी लागल्याने यावेळीस मात्र या पराभवाचा वचपा पवार कुटुंब नक्की काढणार आहे