रायगड मधील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे बोगस...

बोगस कामांची केंद्र व राज्य शासनाकडून चौकशी होण्याची शक्यता?

Milind Mane     12-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Raigad ; 
रायगड जिल्ह्यातील 1444 पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे चालू होती यावरती 1200 कोटी रुपयांचा खर्च होणार असला तरी मूळ ठेकेदाराऐवजी उपटेकेदाराने केलेल्या कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामांची लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामांची चौकशी केंद्र सरकारच्या दबावामुळे राज्य सरकार करणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे.

रायगड मधील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे बोगस 
रायगड जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीच्या सहकार्याने राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात 1444पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत. नळ पाणीपुरवठा योजनांची कामे मोठ्या धुमधडाक्यात चालू केली मात्र ही कामे चालू करताना कोणत्याही प्रकारे ई-निविदा प्रक्रियेची व कोणत्याही वर्तमानपत्रांमध्ये त्याची प्रसिद्ध न करता मर्जीतील ठेकेदारांना कामे वाटण्याचा उद्योग रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना लेखी पत्र पाठवून अलिबागचे सामाजिक कार्यकर्ता संजय सावंत यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गेतील कामांमधील भ्रष्टाचारच उघड केला होता त्याची दखल केंद्र सरकारने तर घेतली परंतु अलिबागचे शेका पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी विधानसभेत या जलजीवन योजनेमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.
 
केंद्र सरकारने रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांमधील भ्रष्टाचाराची गंभीर दखल घेतली असून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार मार्फत व केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाराच्या नियंत्रणाखाली रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामाच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार असल्याने रायगड जिल्हा परिषदेतील या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदारांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
 
रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत काम करणाऱ्या मुख्य ठेकेदाराने ऐवजी उप ठेकेदार नेमूनच अनेक गावातील कामे निकृष्ट दर्जाचे नळ पाणीपुरवठा योजनेचे पाईप वापरून ही कामे करण्यात आली आहे तसेच अनेक कामे करताना मुख्य ठेकेदाराने 30 ते 40 टक्के रक्कम कापून घेऊन शेप ठेकेदाराला 60 ते 70 टक्के वर काम करण्यास भाग पाडले आहे.
 
रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजने अंतर्गत केलेल्या कामाबाबत सदरच्या कामांची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदावर एक वर्षाची असणार आहे मात्र काम तर सब ठेकेदाराने केले आहे मग या कामाची जबाबदारी मूळ ठेकेदार घेणार की शब् ठेकेदार घेणार यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 
रायगड जिल्ह्यातील एकेका ठेकेदाराला 50 च्या वर म्हणजे सुमारे 100 कोटी ची कामे एकेका ठेकेदाराला देण्यात आली आहेत तसेच मूळ ठेकेदाराने यापूर्वी कधीही नळ पाणीपुरवठा योजनेची कामे केलेली नाही त्या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत केवळ रस्त्यांची व साकवांची तसेच सामाजिक सभागृह बांधणे स्मशानभूमी शेड बांधणे इत्यादी कामे केली आहेत त्या ठेकेदाराला नळ पाणीपुरवठा योजनेची कामे देताना कोणता निकष लावला याबाबत मोठे गोड बंगाल असल्याचे बोलले जात आहे.
 
रायगड जिल्हा परिषदेने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे मंजूर झाल्यावर त्याची ई-निविदा प्रसिद्ध करणे किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्धी देणे गरजेचे असताना या दोन्ही नियमाला हरताळ फासण्याचे काम रायगड जिल्ह्यातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ आपल्या कार्यकर्त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रत्येकाला खिरापतीप्रमाणे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांचे वाटप गावनिहाय केले आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड ,उरण ,पनवेल, कर्जत ,खालापूर ,पेण, सुधागड, रोहा ,श्रीवर्धन, मशाळा ,तळा माणगाव, महाड ,पोलादपूर. या 15 तालुक्यातील ज्या गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली ते निकृष्ट दर्जाची होती त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारी गायब करण्यात आला.
 
ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केल्याने अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष भेटून व त्यांच्या वेब पोर्टलवर लेखी तक्रारी केल्याने केंद्र सरकारने याचे गांभीर्य ओळखून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामांबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांकडून लाभ विचारला जाईल त्या वेळेला आपण उत्तर काय द्यायचे असा प्रश्न भाजपा नेत्यांपुढे पडला असल्याने त्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचार करणाऱ्यांना ठेकेदारांना व अधिकाऱ्यांना योग्य तो धडा देण्याचे तयारी चालू केली असल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
 
रायगड जिल्ह्यात रायगड लोकसभा व मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा डोळा असून या दोन्ही पिकांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली असून रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराबाबत लवकरच कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू झाली तर रायगड जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलली जाईल असे संकेत प्राप्त होत आहेत.