य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी 20 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ...

जनदूत टिम    11-Aug-2023
Total Views |
Maharashtra : 

य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी 20 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ 
 
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची मुदत आता 20 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे प्रवेश मुलाना विद्यापीठाच्या वेबसाईट www.ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने घेता येणार आहेत.
 
विशेष म्हणजे विद्यार्थ्याना ड्युअल पदवी, पदविका देखील घेण्याची सुविधा य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या विद्यापीठातून जर विद्यार्थी पारंपारीक डिग्रीला प्रवेश घेतला असेल तर, मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही पदवी, पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेऊन पारंपारीक पदवीसोबत तो विद्यार्थी अतिरीक्त पदवी, पदविका देखील मिळवू शकतो. मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी राज्यातील कारागृहातील बंदिवान, अंध व्यक्ती याना प्रवेश मोफत आहे. तसेच अनुसूचित जाती, जमातीसाठी १९० रूपयात अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकेल.
 
बीए, बीकॉम तसेच पत्रकारीता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना वयाची अट असणार नाही. पत्रकारीता डिग्री व डिप्वोमा ( बारावी उत्तीर्ण नंतर) साठी प्रवेश घेताना विद्यापीठाच्या वेबसाईटवर जर्नालिझम डिप्लोमा साठी MCJ P03 व पदवी साठी G15 हा संकेतांक असून अभ्यास क्रेंद्र कोड 35312 भरायचा आहे.
 
प्रवेश ऑनलाईन पध्दतीने घेता येणार असून बारावी उत्तीर्ण सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटो सोबत जोडायचा आहे. अधिक माहिती तसेच ऑफलाईन प्रवेशासाठी आनंद विश्व गुरूकुल कॉलेज, रघुनाथ नगर. तीन हात नाका जंक्शन, हायवे हॉस्पीटलजवळ ठाणे पश्चिम येथे दुपारी 2 ते सायंकाळी ६ वेळेत संपर्क आकाश ढवळ ८२९१० ९२५११ वर करता येईल.