अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात...

आमदार अतुल भातखळकर यांचे प्रयत्न यशश्वी...

अतुल भातखळकर,    01-Aug-2023
Total Views |
Mumbai : Kandivali ;
कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला येथे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन मंगळवारी आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन उत्साहात
 
लोखंडवाला येथील अण्णा भाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजातील कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकसांसाठी झगडण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे.
 
अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हि व्यक्तिमत्वे आमच्यासाठी राजकारणाचे विषय नाहीत. ही व्यक्तिमत्वेच इतकी मोठी आहेत कि त्यांनी समाजाला, देशाला नाही तर उभ्या जगाला मार्गदर्शन करण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.