महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील.

आमदार निकोले यांच्या लक्षवेधी वर महसूल मंत्र्यांचे उत्तर...

जनदूत टिम    18-Jul-2023
Total Views |
मुंबई :–
महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या लक्षवेधी वर उत्तर देताना सांगितले आहे.

महाराष्ट्र  गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक
 
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, महाराष्ट्र - गुजरात सीमावाद प्रश्न गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेला आहे. गुजरात राज्यातील उमरगाव तालुका आणि महाराष्ट्र राज्यातील डहाणू व तलासरी या सिमेवर हा वाद निर्माण झालेला आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमेवर ज्या - ज्या ग्रामपंचायत त्या वेवजी, गिरगाव, हिमानिया, झाई, सांभा, आच्छाड या आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत. गुजरात राज्यातील उमरगाव गोवाडे, सूलसुंभा सध्या उमरगाव तालुक्यातील ज्या सूलसुंभा ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायत मध्ये जवळ जवळ 500 मीटर जागेवर अतिक्रमण केलेले आहे.

महाराष्ट्र  गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक 
 
मागच्या वर्षी गुजरात राज्यातील उमरगाव तालुक्यातील गोवाडे ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील झाई गावातील काही रहिवाश्यांना नोटीस बजावली होती की, तुमची घर ही आमच्या गोवाडे गुजरात राज्याच्या हद्दीत आहेत. खरे म्हणजे वेवजी ग्रामपंचायत ही आपल्या महाराष्ट्र राज्याची आहे. येथील सर्व्हे क्र. 204 यांचा फेरफार क्र. 144 असा पडलेला आहे ती जागा साधारणपणे 05 एकर 30 गुंठे जागा आहे. ही जागा आजही गुजरात च्या सूलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. खर म्हणजे हा 7/12 आपला महाराष्ट्रातील तलासरी तील वेवजी ग्रामपंचायातचा आहे. हे अतिक्रमण झालेलं आहे.
 
वेळोवेळी वेवजी ग्रामपंचायतने नोटीसा बाजावेलेल्या आहेत की, ही जी जागा आहे तुमच्या हद्दीमध्ये ही ती आमची जागा आहे. आज हा वाद वाढत चाललेला आहे. 15 दिवसापूर्वी झाई गावातील ग्रामस्थ हे माझ्या कडे एकत्र होऊन आले होते त्यांनी सांगितले की, हा वाद अति तीव्र होत चालेला आहे इथे राहणारा समाज दोन्ही गावात बऱ्यापैकी आदिवासी समाज आहे. त्यामुळे मंत्र्यांनी लवकरात लवकर हा सीमावाद आहे त्यांचे सीमांकन निश्चित झालेले नाही. त्याअनुषगाने लवकरात लवकर हा विषय मिटवावा. तसेच, गुजरात राज्याने कोणतेही पुरावे सादर केलेले नाही. त्याचप्रमाणे या सीमेवर जो रेल्वे पूल होत हा सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायत मध्ये 20 मीटर आत मध्ये आलेला आहे.
 
अश्या प्रकारचे अतिक्रमण हे उमरगाव तालुक्यातील सुलसुंबा या प्रकारच्या ग्रामपंचायत चे अतिक्रमण दिसेन दिवस वाढत चालेल आहे. हा एक कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सोडविणार आहात का ? असा माझ्या प्रश्न आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विचारणा केली असता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गावाला भेट दिलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये जिल्ह्याधिकारी, विभागीय आयुक्त यांना त्या ठिकाणी पाठवू. आणि उक्त प्रश्न सुटला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, त्या अनुषगाने लवकर बैठक घेण्यात येईल असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.