कोविड महामारीत मोलाची सेवा बजावत, साथ दिलेल्या १०८ आपत्कालीन सेवेतील कर्मचारी मात्र वा-यावर ?

जनदूत टिम    17-Jul-2023
Total Views |
मुरबाड -: दि १७
महाराष्ट - सरकारने गोर गरीब जनतेला निःशुल्क १०८ नंबरची आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली. या सेवेचा सर्व जनतेला लाभ झाला व होत ही आहे.

कोविड महामारीत मोलाची सेवा बजावत 
 
प्रसूती, सर्प दंश, रस्त्यातील आपघत, हृदय विकार, इत्यादी आजारातील रुग्णांना घरून रुग्णालय ,रुग्णालय ते रुग्णालय अशा लाखो रुग्णांना सेवा ही १०८ देत आली आहे . १०८ ने लाखो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे तिला नवसंजीवनी म्हणून ओळखले जात आहे.
 
२०२० मध्ये महाराष्ट्रात कोवीड १९ या महाभयंकर आजाराने थैमान घातले होते. त्यावेळी जनजिवन विस्कळीत होत मनुष्यच माणसाचा शत्रु समजून सगळेच एकांतवासात गेले होते , सर्व जनताच घरात बसली होती. बाजारहाट ,चौक शहर, रस्ते सुन्न पडले होते. चिट पाखरू कुठे बाहेर फिरताना दिसत नव्हता. ज्याला कोवीड झाला अस समजले त्याचा रक्ताचे नातलग , मुलगा,पती - पत्नी , आई वडिल , कोणीही असो त्याच्या जवळ जात नव्हते. लांबूनच जे काही असेल ते बोललं जात होत. अशा परस्थितीत महाराष्ट्रातील १०८ या नवसंजिवनी वरील कर्मचारी पायलट( वाहनचालक) आणि डॉकटर घरोघरी जाऊन रुग्णांना आधार देत, त्याला धीर देत रुग्णालया पर्यंत पोहचवत होता. त्याला स्वतः हातानी उचलून रुग्णवाहिकेत घेऊन रुग्णालया पर्यंत पोहचवत होता . जो तो आपल्या स्वतःच्या जीव कसा सुखरूप राहील , मला या कोवीड आजाराची लागण होणार नाही . याची काळजी घेऊन घरात आरामात बसून खात पित व झोपत होता. मात्र १०८चे पायलट ( वाहनचालक ) मात्र आपले आई - वडील, पत्नी, मुले सोडून स्वतःच्या जीवाचा विचार न करता , आहोरत्र जनतेची सेवा करत होते. स्वतःच्या जीवाचा मुलाबाळांच्या विचार न करता, या कामाचा मोबदला काय मिळेल याचा विचार न करता " जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा " या व्याक्या प्रमाणे प्रामाणिक पणे काम करत राहिलेल्या कोवीड योध्याच्या समस्या , गरजा कोणीही कधी समजून घेतल्या गेल्या नाहित, की त्याची विचारपुस केली नाही. यात काही पायलट व डॉक्टर आपला जीव ही गमावून बसले. पण सेवा देताना मागे हटले नाहीत.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख 
 
रस्त्यात जाताना आपघात झाला की, लगेच १०८ ला कोणीतरी फोन लावला जातो. पायलट ,डॉक्टर यांना तो कॉल येतो. त्यावेळी जेवायला बसलेले असेल तर तोंडातला घास तोंडात आणि हातातला घास ताटात ठेऊन तात्काळ त्या रुग्णाला सेवा देतो. अशा या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यावर कोणाचा लक्ष जात नाही . तेवढं हा महत्वाचं घटक असताना एवढा दुर्लक्षित राहिला आहे? तुटपुंज्या पगारात आपल्या कुटुंबाचा उदर्निर्वाह कसा होणार याचा विचार न करता रुग्णांची सेवा करत राहिला आहे.
 
शासनाने १०८चा ठेका एका bvg या कंपनीला दिला आहे. आठ वर्ष काम करून देखील या कर्मचाऱ्यांना १२- १५ हजार पगारावर बारा तास राबवलं जात आहे. शासनाकडून कंपनीला सगळं दिलं जातं परंतु कंपनी कर्मचाऱ्यांची लूट व शोषन करत आहे. शासन फक्त घोषणा करते समान काम समान वेतन लागू केलं परंतु प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्याला दिलं काहीच जात नाही . याच कारण शासनाचा त्यांच्यावर अंकुश नसतो. त्यामुळे शासनाने अशा कंपन्यांवर अंकुश ठेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
अखंड महाराष्ट्रातील पायलट एकत्र येऊन आपल्या व्यथा आपल्या मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री खाजादार, आमदार यांच्या कडे मांडत आहेत. त्यांना निवेदन देत आहेत. की, साहेब आमच्यावर लक्ष द्या. आम्ही दुर्लक्षित झालेलो घटक बनलो आहोत तर आमच्या जास्त काही मागण्या नाहीत .१) समान काम समान वेतन २) NRHM मध्ये सामावून घ्या ३) कामाचे तास आठ करा अशा मागण्या घेऊन न्याय मागत आहेत. या त्यांच्या व्यथा कोणी समजाऊन घेईल का आणि या जनतेच्या सेवकाला कोणी न्याय मिळून देईल का?
 
"आम्ही कोवीड योध्ये आज ही जनतेला सेवा देत आहोत. पण या सरकारने आमच्यावर लक्ष द्यावे." (महाराष्ट्रराज्य कोअर कमिटी अध्यक्ष तेजस कराळे.)
 
"कोवीड काळात आम्हाला पाणी सुधा कोणी प्यायला देत नव्हतं,आम्ही रस्त्यातील नळावर जाऊन पाणी पित होतो". ( दिनेश पाटील १०८ संदिप पष्टे कोवीड योद्धा पायलट)