शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना...

जनदूत टिम    12-Jun-2023
Total Views |
Maharashtra ; पालघर : 
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासप्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थींनीचे राज्य व देशांतर्गत रु. 10. लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु. 20. लक्ष पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज योजना. राविण्यात येत आहे.

EDUCATION
 
योजनेत समाविष्ट करावयाचे अभ्यासक्रम : राज्यातील शासनाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांनी, केंद्रीय परिषदांची मान्यता असलेल्या, राज्यांतर्गत शैक्षणिक संस्थामध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले अर्जदार. वैद्यकिय (Medical), अभियांत्रिकी (Engineering), व्यावसायिक व व्यवस्थापकीय (Professional and Management), कृषी (Agriculture), अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान (Food Processing and Animal Science) या संबंधातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
 
योजनेचे स्वरुप :
देशांतर्गत अभ्यासक्रमाकरीता रु.10. लक्ष तसेच परदेशी अभ्यासक्रमाकरीता रु.20. लक्षच्या मर्यादेत बँकेने कर्ज मंजुर केलेल्या कर्जाचे विद्यार्थ्याने वेळेत हप्ते भरल्यास त्यामधील व्याजाची रक्कम 12% च्या मर्यादेत विद्यार्थ्याच्या आधारलिंक खात्यात महामंडळामार्फत व्याज परतावा जमा करण्यात येईल.
 
विद्यार्थ्यांची पात्रता :
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वय 17 ते 30 असावे, इयत्ता 12 वी 60% गुणांसह पास असलेले विद्यार्थी पात्र राहतील, पदवीच्या द्वीतीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 60% गुणांसह पदविका तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामिण व शहरी भागाकरीता रु. 8.00 लक्ष असावे.
 
अर्ज करण्याची पद्धत :
अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने www.msobcfdc.org या संकेतस्थळ / वेबसाईटवर अर्ज सादर करावा.
अधिक माहिती साठी जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालयाचा पत्ता - आफ्रीन अपार्टमेंट, बी विंग, फ्लॅट नं. 106, पहिला मजला, नवली रेल्वे फाटक रोड, नवली, पालघर (पूर्व), ता. जि. पालघर- 401 404. दूरध्वनी क्र / भ्रमणध्वनी क्र. - 8879945080 / 9209631722. ई-मेल : [email protected] यांच्याशी संपर्क साधावा.