■ अंद्धश्रद्धा हटाओ , विज्ञानवादी बनो - जरा डोकं तर चालवा...

जनदूत टिम    22-May-2023
Total Views |
 मुंबईः
●१. ‪बाळाला काळे टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात बालमृत्यूदर शून्य असता.
●२. गाडीला लिंबूमिरची लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात अपघातांची संख्या शून्य असती.
● ३. पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच उद्योजक झाले असते.
●४. बुवाबाबा कडे जाऊन दु:ख निवारण झाले असते तर समस्त बुवाबाबा भक्त सुखी दिसले असते.
●५. कुंडल्या मिळवून नवरा बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज मॅरेजेस यशस्वी झाली असती.
●६. यज्ञ करून जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता.
●७. चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल.
 

andhashradhha 
💥 मुहूर्ताचे वेड :
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहत नाही. व मरतानाही पाहत नाहीत.
तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ असतात.
फक्त इच्छाशक्ती प्रबळ असली की. आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ ठरतात.
● कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात ?
●पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का ?
●९५ % विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा ?
■ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते ?
एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?
■ मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात ?
मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !
♀शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक, राष्ट्रपती, पंतप्रधान होईल काय ?
♀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली व्यक्ती ती पण अंबानीसारखी झाली का ?
♀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना, व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.
तरी सुद्धा कित्येकांना अपयश येते असे का ?
★: कारण :
मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा भारत देश गिळून बसली.
स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.
जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही ' शुभ मुहूर्तच ' असते
चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या...कष्टावर विश्वास ठेवा.
💥चला आपला समाज अंधश्रद्धामुक्त करूया!
आपण सुधारलो तर जग सुधारेल, याच नियमाने क्रांती होईल.
✍️
*😊मी विज्ञानवादी😊
मनिष नगराळे फोटोग्राफर
9869510695.*9769536878