school nutrition : शालेय पोषण आहारातून मिळणार अंडी आणि केळी...

जनदूत टिम    08-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Government schools ;
राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एकदा अंडी तसेच अंडी न खाणार्‍या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहेत.

 शालेय पोषण आहारातून मिळणार अंडी आणि केळी 
 
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील 23 आठवड्यांकरीता हा उपक्रम सुरू राहणार आहे. अंड्याचा सध्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रूपये दर निश्चित करण्यात आला आहे.
 
विद्यार्थ्यांना अंडी खाण्याचे फायदे :
 
  • विद्यार्थ्यांची वाढ चांगल्याप्रकारे होते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते
  • अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने असतात.
  • अंड्यामध्ये उच्च प्रतीचे लोह असतात.
  • अंड्यामध्ये उच्च प्रतीचे उष्मांक असतात.
  • अंड्यामध्ये उच्च प्रतीचे जीवनसत्व असतात.
  • अंड्यामध्ये उच्च प्रतीचे कॅल्शियम असतात.
  • अंड्यामध्ये उच्च प्रतीचे कर्बोदके असतात.