माझी नोंदमधील नोंदीचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो का ?

बालभारतीकडून एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा आढावा...

जनदूत टिम    26-Oct-2023
Total Views |
  • पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या उपक्रमाचे सर्वेक्षण
  • शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना प्रतिसाद नोंदविण्याचे आवाहन
Maharashtra : Education ;
पहिली - ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांना यंदा वह्यांची पाने जोडण्यात आली आहेत. या एकात्मिक पाठ्यपुस्तकांना शाळांमधून मिळणाया प्रतिसादाचा आढावा घेण्याचे काम राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) सुरू केले आहे.

माझी नोंदमधील नोंदीचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो का   
पाठ्यपुस्तकांना जोडण्यात आलेली वह्यांची पाने तसेच माझी नोंदमधील नोंदींचा विद्यार्थ्यांना उपयोग होतो का, हे तपासण्यासाठी बालभारतीने सर्वेक्षण लिंक तयार केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत या लिंकवर प्रतिसाद नोंदवायचा आहे.
बालभारतीच्या सर्वेक्षण लिंकवर प्रश्नावली देण्यात आली आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजीतून असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
 
त्यासाठी प्रत्येक प्रश्नाखाली उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले आहेत. यात शिक्षक, पालक अथवा विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, इयत्ता, माध्यम, शाळेचे नाव आणि यूडायस क्रमांक, जिल्हा, तालुका नोंदवायचा आहे. एकात्मिक पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पानांची उपयोगता आणि यशस्विता याचा आढावा या सर्वेक्षणातून घेतला जाणार आहे.
 
सर्वेक्षणातील प्रश्नावली :
  • सर्व विषयांचे एकत्रित पाठ्यपुस्तक योग्य आहे की अयोग्य?
  • दप्तरात कोणकोणत्या वस्तू असतात?
  • कात्मिक पाठ्यपुस्तकामुळे दप्तराचे ओझे कसे वाटते? 
  • पुस्तकातील वह्यांची कोरी पाने विद्यार्थ्यांना आवडतात का?
  • माझी नोंदवरील नोंदींचा विद्यार्थ्यांना कशासाठी उपयोग होतो?
  • माझी नोंदवरील नोंदी घेताना अडचणी येतात का?
  • एकात्मिक पाठ्यपुस्तक्ने आवडली का?