पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप...

‘यूजीसी"कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध, प्रत्येक घटकाची जबाबदारी स्पष्ट.

जनदूत टिम    16-Oct-2023
Total Views |
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यारांना इंटर्नशिपसाठी मार्गदर्शक सूचना मसुदा प्रसिद्ध केला आहे. संशोधन त्यानूर तीन वर्षे पदवीच्या विद्याथ्यांना ६० १२० तास इंटर्नशिप, तर चार वर्षे दवीच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशक्षण (रिसर्च इंटर्नशिप) पूर्ण करावेलागणार आहे. त्यातून विद्यार्थी साधारपणे १२ क्रेडिट्स मिळवू शकता. तंत्रशिक्षण आणि काही व्यावयिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांच्या विद्याथ्यांना कार्यशक्षणाची सक्ती नाही.

पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप  
राप्य शैक्षणिक धोरण २०२० मध्ये उच्च रक्षणातील पदवीपूर्व स्तरावर विद्याथ्र्यांना अनुभवातून शिक्षण आणि संशोधनावर भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 'यूजीसी'ने 'पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, रिसर्च इंटर्नशिप' या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा वेबसाइटवर प्रसिद्ध केला. पदवीप्राप्त विद्याथ्यांना नोकरी मिळण्यासाठी आवश्यक ज्ञान, कार्यानुभव, अनुभव असणे आवश्यक असते. मात्र विद्याथ्र्यांकडे त्याचा अभाव असल्याने नोकरी मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे विद्याथ्र्यांची रोजगारक्षम कौशल्ये वाढवणे, त्यांची क्षमतावृद्धी, व्यावसायिक कार्यानुभव, आत्मविश्वास वाढवणे, संशोधनात रस निर्माण करणे या दृष्टीने इंटर्नशिप उपाय ठरू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.
 
मार्गदर्शक सूचनांमध्ये उच्च शिक्षण संस्था, कार्यप्रशिक्षण देणारी संस्था, उच्च शिक्षण संस्थेतील समन्वयक, कार्यप्रशिक्षण समन्वयक अशा प्रत्येक घटकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण संस्थेत संशोधन विकास कक्षाची स्थापना करावी लागेल. त्याचप्रमाणे इंटर्नशिपची प्रक्रिया राबवण्यासाठी कक्षात समन्वयाचीही नेमणूक किंवा यंत्रणा निर्माण करावी लागेल. या मार्गदर्शक सूचनांच्या मसुद्यावर हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत असल्याचे 'यूजीसी'चे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
 
विद्याथ्र्यांच्या मूल्यमापनाचे निकष इंटर्नशिपच्या दरम्यान विद्यार्थ्यांची उपस्थिती, त्यांनी मिळवलेली कौशल्य, संशोधनातील खरेपणा आणि नावीन्यपूर्ण योगदान, संशोधनाचे महत्त्व अशा निकषांवर विद्याथ्यांचे मूल्यमापन केले जाईल.
 
या क्षेत्रांत संधी :
व्यापार आणि कृषी क्षेत्र अर्थव्यवस्था आणि बँकिंग, आर्थिक सेवा, विमा, चाहतूक, माहिती तंत्रज्ञान, हस्तकला, कला, डिझाइन, संगीत, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान, पर्यटन आणि आतिथ्य सेवा, पर्यावरण, वाणिज्य आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करता येईल किंवा संशोधन करता येईल.
 
दोन प्रकारच्या इंटर्नशिपचा समावेश :
मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता वाढवणे, संशोधनक्षमता निर्माण करण्यासाठी पदवी अभ्यासक्रमात दोन प्रकारच्या इंटर्नशिपचा समावेश आहे. त्यात तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्याथ्यांना ६० ते १२० तासांची इंटर्नशिप पूर्ण करावी लागेल, तर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्याथ्र्यांना आठव्या सत्रात रिसर्च इंटर्नशिप पूर्ण करणे बंधनकारक आहे. उच्च शिक्षण संस्थांना स्थानिक उद्योग, संशोधन संस्थांशी इंटर्नशिप, संशोधनासाठी करार करावा लागणार आहे