फार्मसी कॉलेजांचा फुगवटा...

डी. फार्मसीची १३६; तर बी. फार्मसीची ५७ नवी कॉलेजे सुरू,

जनदूत टिम    10-Oct-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ; 
शिक्षण क्षेत्रातून चिंता; शिक्षणाचा दर्जा घटण्याची शक्यता व्यक्त...

फार्मसी कॉलेजांचा फुगवटा 
राज्यात यंदा डी.फार्मसीची १३६, तर बी.फार्मसीची ५७ नवी कॉलेज सुरू झाली आहे. त्यातून यंदा फार्मसीच्या रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, डी.फार्मसीच्या सहा हजार ९७७, तर बी. फार्मसीच्या तब्बल १४ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यातून फार्मसी कॉलेजांच्या तयार झालेल्या फुगवट्यावर शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
 
देशपातळीवर 'फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया' (पीसीआय) या शिखर संस्थेकडून फार्मसी कॉलेजांना मान्यता दिली जाते. यंदा राज्यातील ६२८ कॉलेजांमध्ये डी.फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आले आहेत. यातील १३६ कॉलेज यंदा नव्याने सुरू झाली आहेत. या सर्व कॉलेजांमध्ये मिळून प्रवेशासाठी ३७ हजार ६९० जागा उपलब्ध आहेत. मात्र केवळ ३० हजार ७१३ जागांवर प्रवेश झाले असून, ६, ९७७ जागा रिक्त आहेत राज्यात बी. फार्मसी अभ्यासक्रमासाठी ४५३ कॉलेज असून, त्यातील ५७ कॉलेज नव्याने सुरू झाली आहेत. या सर्व कॉलेजांमध्ये मिळून प्रवेशासाठी ४२ हजार ७९४ जागा उपलब्ध आहेत. यातील केवळ २८ हजार ४३२ जागांवर प्रवेश झाले असून तब्बल १४ हजार ३६२ जागा रिक्त आहेत.
 
दरम्यान, काही विद्यापीठांनी दाखल प्रस्तावांची पूर्णपणे तपासणी हरकत प्रमाणपत्र दिली आहेत. तसेच 'पीसीआय' नेही पुढील सोपस्कार पूर्ण केले आहेत. त्यातून पीसीआय आणि विद्यापीठांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, असे फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञांनी नमूद केले. यातून राज्यात फार्मसी कॉलेजांचा फुगवटा निर्माण केला जात आहे असे मत उच्च शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध अटीवर व्यक्त केले.
 
तसेच राज्यात वाढलेल्या फार्मसी या कॉलेजांची संख्या ही चिंतेची बा आहे. त्यातून फार्मसी शिक्ष घटण्याची शक्यता असून शिकणाच्या अ गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो हा स दर्जा टीकविण्यासाठी कॉले नियमित प्राचार्य, शिक्षक, पयाभूत सुविधा यांची तंत्रशिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी नियमित संयुक्त करायला हवी. कॉलेजांमध्ये उपकरणे उपलब्ध आहेत का नाही हे जेणेकरून शिक्षणाचा दर्जा टकविणे संस्थांना बांधील राहील, असे मत अखिल भारतीय फार्मसी शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर यांनी व्यक्त केले.
 
राज्यात यावर्षी एका मोठ्या प्रमाणात अचानक फार्मसी कॉलेज सुरू झाली आहेत. मात्र एवढ्या फार्मासिस्टची गरज आहे का? या सर्वांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील का, हा प्रश्न आहे, असे मत इंडियन फामसिटीकल असोसिएशनच्या उपाध्यक्षा प्रा. मंजिरी घरत यांनी व्यक्त केले.
 
बेरोजगारांची संख्या वाढणार ;
एकीकडे सरकारी रुग्णालयात खाटांच्या प्रमाणात फार्मासिस्टची पदे भरली जात नाहीत. खासगी क्षेत्रातही नोकरीच्या संधी घटत आहेत. त्यातून फार्मासिस्टची अवस्था इंजिनीअर्ससारखी होणार असून, फार्मसी कॉलेज बेरोजगारांची निर्मिती करणारा कारखाना ठरणार आहे. त्यामुळे यावर कुठेतरी नियंत्रण यायला हवे, असे मत फार्मसी विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्यचे मुख्य समन्वयक ऋषिकेश सपकाळ यांनी व्यक्त केले.