शिवसेना कायम समाजकारण करणारा पक्ष

जनदूत टिम    19-Jun-2022
Total Views |
शिवसेना कायम समाजकारण करणारा पक्ष - प्रदीप वाघ

मोखाडा : तेजस रोकडे

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे परीसरातील कुपोषित बालके व अंगणवाडीतील बालकांना तसेच गरोदर मातांना शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सकस आहार व खेळणी वाटप करण्यात आले यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की 80% समाज कारण व 20% राजकारण या धर्तीवर कार्य करायचे म्हणून आज महाराष्ट्रात राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे देखील आदिवासी भागातील जनते कडे सहानुभूती पुर्वक लक्ष देत आहेत,आज बालक व मातांना सकस आहार घेणे आवश्यक आहे.तशी व्यवस्था देखील शासनाने केली आहे.आज कुपोषण सारखा कलंक मिटवायचा असेल तर शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन जनजागृती करने गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा , मारुतीची वाडी,बोरशेती,बोरीचीवाडी, येथील कुपोषित बालकांना राजगीरा लाडु, शेंगदाणा चिक्की, बिस्किटे,केळी व खेळणी वाटप करण्यात आली, तसेच गरोदर व स्तनदा माता यांना देखील आहार वाटप करण्यात आला.यावेळी 100 पेक्षा अधिक लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी विक्रमगड विधानसभा संघटक  प्रल्हाद काका कदम, जेष्ठ नेते  डॅॉ.मिठाराम कडव, सभापती आशाताई झुगरे, ‌सरपंच  संजय वाघ, माजी सरपंच  मंगेश दाते,  अक्षय कोरडे, नंदकुमार वाघ चेअरमन,  विठ्ठल गोडे पोलिस पाटील,  भाऊ भोईर जेष्ठ शिवसैनिक,  गणेश खादे  भास्कर गांगड,  रमेश बोटे, अशोक वाघ, नरेंद्र वाघ, मुख्यसेविका विमल कोथे, अंगणवाडी सेविका मुक्ता खादे, वनिता वाघ,मंगल घोटे, वेणुताई वाघ, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते