सुधागडात भाजपला खिंडार, कळंब धनगरवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापचा लाल बावटा घेतला हाती सुरेशशेठ खैरे यांनी केले स्वागत

भूषण सुतार    30-Sep-2021
Total Views |
पाली/गोमाशी : सुधागड तालुक्यात शेकापक्षाच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन येथील कळंब धनगरवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी दि.(28) रोजी भाजपला धक्का देत शेकाप चा लालबावटा दिमाखात फडकवला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे शेकाप नेते तथा जि. प सदस्य सुरेशशेठ खैरे यांनी स्वागत केले.

इरह९_1  H x W:  
 
तरुण तडफदार व सक्षम नेतृत्व मा.आमदार धैर्यशिलदादा पाटील व धडाडीचे शे.का.प नेते सुरेशशेठ खैरे यांच्या कुशल नेतृत्व व प्रभावी कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच विकासकामांवर आकर्षित होऊन शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवाहात सामिल झालो असल्याचे प्रवेशकर्त्यानी यावेळी सांगितले.
 
प्रवेशकर्त्यात अनंता ढेबे, धोंडू ढेबे, धाऊ ढेबे, राजेश ढेबे, भगवान ढेबे, चंद्रकांत ढेबे, लक्ष्मण ढेबे, किरण खरात, दीपक खरात, महेश खरात, बापू बावदाने, सुनिल बावदाने, भगवान बावदाने, राजेश बावदाने, महादेव बावदाने, दशरथ बावदाने, नरेश आखाडे, तुकाराम आखाडे, रामा आखाडे, प्रकाश झोरे, तुकाराम राया आखाडे, बबन झोरे, वसंत झोरे, गौरु बेलोसे, उमा बडतोड आदींचा समावेश आहे. यावेळी शेकाप नेते सुरेशशेठ खैरे म्हणाले की सुधागड तालुक्यात शेकापच्या माध्यमातून अत्यंत मूलभूत व ज्वलंत असणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.
 
शेकापच्या माध्यमातून ठिकठिकाणी नळपाणी पुरवठा योजना यशस्वीरीत्या कार्यान्वित केल्या आहेत. तसेच दुर्गम दुर्लक्षित भागासह आदिवासी वाड्या पाड्याना रस्ते जोडणेकामी शेकापची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीद्वारे मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत, शेतकरी कामगार पक्षाचा जोर दिवसागणिक वाढत आहे. पक्षसंघटना मजबूत होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षात युवकांसह महिला व ज्येष्ठ कार्यकर्त्याचा होत असलेला प्रवेश म्हणजे संघटनेला मोठी बळकटी व उभारी मिळणार असल्याचे शेकाप नेते तथा जी. प सदस्य सुरेश शेठ खैरे यांनी सांगितले.
 
शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच कष्टकरी, श्रमजिवी, शोषीत, पिडीत, वंचीत, सर्वसामान्य घटकाच्या उत्कर्षासाठी झोकून देवून काम केले आहे. या पक्षात त्यांना काम करण्यासाठी मोकळीक व संधी दिली जाईल, असे सुरेश शेठ खैरे यावेळी म्हणाले.
यावेळी शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, पांडुरंग आखाडे, विलास मानकर, विठ्ठल सिंदकर, सरपंच संजय हुले,गुलाब हिरवे, ऍड: प्रवीण कुंभार, संतोष चव्हाण, राजेश तळेकर, राकेश मानकर, नामदेव बडतोड, अमोल मानकर, रमेश हिरवे, सुभाष बडतोड, हरेश वारे, मूलचंद बडतोड, वसंत बडतोड, निखिल मानकर, दीपक मानकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.