खालापुरमध्ये ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन हा वेध सह्याद्रीचा स्तुत्य उपक्रम

भूषण सुतार    27-Sep-2021
Total Views |
पाली/गोमाशी : खालापूर शहरातील प्राचीन असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत होत्या.त्या वास्तूचे संवर्धन करण्यासाठी रविवारी (ता.२६) रोजी वेध सह्याद्रीने मोहीम राबविली होती.
 
खालापूर तालुक्याला ऐतिहासिक दृष्ट्या वेगळेच महत्त्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळते, इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून आज खालापूराकडे पहिले जाते. अनेक परिसरात आज विविध प्रकारचे ऐतिहासिक अवशेष सापडताना पहायला मिळत आहेत.ऐतिहासिक घटनांची साक्ष देणाऱ्या वास्तू जतन करणे हे आपले कर्तव्य असून पुढील पीढीसाठी या अवशेषांचे जतन होणे गरजेचे असल्याची संकल्पना घेत वेध सह्याद्री तर्फे खालापूरत सोमेश्वर मंदीर परिसरात संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
 
manhsa5_1  H x
 
या मोहिमे दरम्यान मातीत गाडले गेलेल्या समाधी शिळा, नंदी यांना जमिनीतून बाहेर काढत मोकळे करून स्वच्छता करण्यात आली तसेच शिळा व वीरगळ यांची स्वच्छता करण्यात आली.विरगळीला इतिहास महत्वाचे स्थान असून जो वीरपुरूष जमीन, पशु अथवा आपली स्त्री यांच्या सौरक्षणासाठी लढत असत त्यांच्या मृत्यू नंतर वीरगळ बनवण्यात येत होती. या विरघळी खालापूर परिसरात सापडत आहेत या वरून ऐतिहासिक दृष्ट्या आपल्या परीसराचे महत्व लक्षात येते.
 
मोहिमे दरम्यान स्थानिक रहिवासी व मंदिर परिसराची देखरेख करणारे डॉ. आठवले तसेच इतिहास अभ्यासक सागर सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले मोहीम यशस्वी करण्यासाठी वेध सह्याद्रीच्या सर्व सदस्यांनी यावेळी मेहनत घेत पुन्हा एकदा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंदिर परिसरात अजूनही काही अवशेष असून विष्णू, गणपती तसेच प्राचीन देवांच्या मुर्त्या सुद्धा दुर्लक्षित आहेत हे सर्व अवशेष संवर्धन होई पर्यंत मोहीम सुरू राहणार असल्याचे वेध सह्याद्री मार्फत सांगण्यात आले आहे.
या वेळी उपस्थित डॉ.आठवले व इतिहास अभ्यासक सागर सुर्वे यांनी वेध सह्याद्री तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमाला शुभेच्छा देत सहभागी सदस्यांचे कौतुक केले मोहिमेत मोहीम प्रमुख म्हणून प्रफुल्ल किलांजे यांनी उत्तम रित्या नियोजन केल्याचे पहायला मिळाले.