सुनील म्हसकर ठरले मानवसेवा विकास फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

जनदूत टिम    27-Sep-2021
Total Views |
ठाणे : मानवसेवा विकास फाऊंडेशन, अंजनगाव सुर्जी, अमरावती,महाराष्ट्र राज्य ही सेवाभावी संस्था राष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम व कार्यक्रम राबवत असते! नुकताच संस्थेच्या वतीने संस्थेचे प्रदेश संघटक व्ही. एस.पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त "जिल्हा व राज्यस्तरीय मानवसेवा पुरस्कार २०२१" सन्मान सोहळा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे,शहापूर येथे २५ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाला.
 
mhaskar_1  H x
 
या सन्मान सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तिमत्वांना लोकहिंद चॅनेल व साप्ताहिक शिवमार्गचे संपादक महेशकुमार धानके, ह.भ.प. कैलास महाराज निचिते, संस्थेचे प्रदेश संघटक व्ही.एस.पाटील, कुणबी महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र चंदे ,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी जनार्दन कोष्टी, मनोज निचिते (पोलीस पाटील, काजलविहिर), विजयकुमार देसले यांच्या व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाचे सहशिक्षक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक सुनील म्हसकर सर यांस राज्यस्तरीय मानवसेवा पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले! त्याचा त्यांस खूपच आनंद झाला असून, राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याने आता त्यांची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे, त्यांनी म्हटले आहे! सुनील म्हसकर सर हे राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांचे संस्थेकडून, पाली ग्रामस्थांकडून तसेच श्रीरंग विद्यालयाकडून आणि समाजातील अनेक नामवंत, गुणवंत व्यक्ती व विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे!