जिल्हा परिषदेच्या वतीने ८९८९५ बालकांचे पोलिओ लसीकरण

जनदूत टिम    27-Sep-2021
Total Views |

  • शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिम

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ येथे झालेल्या उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ८९८९५ बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली.
 
jilha_1  H x W:
 
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार , आरोग्य व बाधकाम समिती सभापती वंदना भांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
ग्रामीण भागात एकूण १०५८४० लाभार्थी ० ते ५ वयोगटातील अपेक्षित होते त्यापैकी ८९८९५लाभार्थ्यांना पोलिओची मात्रा पाजण्यात आली. म्हणजेच ८५ टक्के काम पूर्ण करण्यात आले. कोरोना साथरोगाच्या काळातही शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ११९६ बुथद्वारे हे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेसाठी एकूण २७६७ कर्मचारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. तत्पूर्वी मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर येथे झाले.