45 हजार निवृत्तीवेतन धारकांचे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी होणार मदत

जनदूत टिम    27-Sep-2021
Total Views |

  • निवृत्तीवेतन धारकांचे अभिलेख आणि मुद्रांक सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात बसविले कॉम्पॅक्टर्स
  • जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन

जिमाका
ठाणे : जिल्हा नियोजन विकास निधीतून येथील जिल्हा कोषागार कार्यालयाला देण्यात आलेल्या कॉम्पॅक्टर्सचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागाचे लेखा व कोषागरे सहसंचालक अनुदीप दिघे, जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे उपस्थित होते.
 
raj_1  H x W: 0
 
या कॉम्पॅक्टर्सच्या माध्यमातून कोषागार कार्यालयातील अभिलेख जतनाचे काम सुलभ आणि सुरक्षित होतानाच संदर्भासाठी अभिलेख तातडीने मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास निधीतीन कोषागार कार्यालायाला दोन कॉम्पॅक्टर्सचा संच देण्यात आला असून त्याद्वारे जिल्ह्यातील सुमारे 45 हजार निवृत्ती वेतनधारकांचे अभिलेख जतन करण्यास मदत होणार आहे.
 
स्ट्रॉंगरुमध्ये बसविण्यात आलेल्या कॉम्पॅक्टर्समुळे मुद्रांकांचे जतन सुलभ पद्धतीने होण्यास मदत होईल. कोषागार कार्यालयात मोठ्या प्रमाणावर शासकीय दस्तावेज जमा होत असतो त्यामुळे अशाप्रकारचे कॉम्पॅक्टर्समुळे हे सर्व दस्तावेज सुरूक्षित ठेवण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी श्री. भोईर यांनी सागितले. यावेळी अपर कोषागार अधिकारी कल्पना थोरात, उपलेखापाल नितीन राणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.