जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे केले जोरदार निदर्शने

जनदूत टिम    22-Sep-2021
Total Views |
ठाणे : ओबीसींच्या न्याय हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी आज ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समर्थकांनी बॅनर,झेंडे,फलक हाती धरून जोरदार निदर्शने केली. ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करणे, भारतीय संविधानाच्या कलम २४३ डी ६ आणि संविधानाच्या कलम २४३ टी ६ मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत येथे ओबीसी वर्गाला २७% राजकीय आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावी.
 
thae_1  H x W:
 
मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करण्यासाठी घटनेमध्ये तरतूद किंवा सुधारणा करून संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, ओबीसी मंत्रालय सुरू करावे, सर्व विभागांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करून नोकर भरती करण्यात यावी, नॉन क्रिमीलेअर रद्द करण्यात यावी, रोहिणी आयोग रद्द करण्यात यावा, नोकरीमध्ये ओबीसींना पदोन्नती देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आज राज्यभर निदर्शने करण्यात आले. ठाणे येथील उपजिल्हाधिकारी मा. सुदाम परदेशी यांना निवेदन देण्यात आले.
 
सदर निवेदने मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा. गृहमंत्री,मा.सामाजिक न्याय मंत्री, मा. रस्ते व वाहतुक मंत्री, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व अन्य प्रमुख पक्षीय नेत्यांना निवेदन मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठविण्याची विनंती कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तारमळे व अरूण मडके यांनी केली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे किसनजी बोंद्रे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ओबीसी महासंघ,एकनाथ तारमळे -कोकण विभागीय अध्यक्ष,अरुण मडके सर-कोकण विभागीय कर्मचारी महासंघ अध्यक्ष,प्रकाश पवार सर-ठाणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ,भालचंद्र गोडांबे सर- सहसचिव ठाणे जिल्हा ओबीसी कर्मचारी महासंघ,उमेश पाटील -युवा राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा, अनिल निचिते -शहापूर तालुका ओबीसी महासंघ अध्यक्ष,मधुकर शिंदे -शहापूर कुणबी निवासी मंडळ उपाध्यक्ष,श्री.श्री. प्रदीप बैकर साहेब -कुणबी समाज प्रतिनिधी,सोपान गोल्हे सर-सचिव मुरबाड ता.ओबीसी कर्मचारी महासंघ,कुमार वेखंडे सर-शहापूर कुणबी निवासी मंडळ उपाध्यक्ष,गुरुनाथ भोईर -संपादक साप्ताहिक ठाणे अरुणोदय (आगरी समाज प्रतिनिधी)लहू देसले -कुणबी समाज प्रतिनिधी ठाणे,जयवंत आगिवले कुणबी समाज प्रतिनिधी ठाणे, अनेक कार्यकर्ते व ओबीसी बांधव उपस्थित होते.
 
ओबीसींच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत. तर यापुढे ओबीसींचे लाखोंचे मोर्चे रस्त्यावर उतरतील, दिल्लीत संसदेला घेराव घालून आंदोलन केले जाईल. असा इशारा कोकण विभागाचे अध्यक्ष एकनाथ तारमळे व ठाणे जिल्हा राष्टीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दिला आहे.