पनवेल उरण महाविकास आघाडीचे एक पाऊल पुढे : लवकरच घरांचे सर्व्हे होणार सुरू

विठ्ठल ममताबादे    22-Sep-2021
Total Views |

  • रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक

उरण : रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय अधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची बैठक झाली होती.
 
maha444_1  H x
 
यावेळी ती बांधकामे नियमित करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्फत परीक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ठाणे येथील एका एजेंसी ला परीक्षण करण्याचे काम दिलेले आहे व त्या परीक्षणसाठी लागणारा खर्च सिडको महामंडळ भरण्यास तयार आहे. तरी लवकरच गावठाणातील घराचा परीक्षण होऊन नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित होतील असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.
 
जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना जिल्हासल्लागार बबनदादा पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल महानगरपालिका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आर सी घरत, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे , महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडू , शशी डोंगरे, रामदास पाटील, नरहरी मढवी,समाजवादी पक्षाचे अलिबाग तालुका अध्यक्ष अश्रफ घट्टे आदी मान्यवर
उपस्थित होते.