स्वातंत्र्यपूर्व काळातील जव्हारचा ऐतिहासिक गणेशोत्सव

पारस सहाणे    17-Sep-2021
Total Views |

  • श्रीराम मंदिर मित्रमंडळाचे हे १२४ वे वर्षे; जव्हारचा राजा विराजमान जपले सामाजिक भान

जव्हार : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जागृकता निर्माण करण्यासाठी व महाराष्ट्रातील लोकांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्यासाठी बाल गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांनी सन १८९४ मध्ये पुण्याच्या विंचूरकर वाड्यात गणेशउत्सवाची सुरुवात केली.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्याचे आव्हान केल्यानंतर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारतातील एक जुनं आदिवासी संस्थान असलेले जव्हार या गावातही गणेशोत्सवाला सुरुवात झाली जव्हार शहराच्या मध्यवर्ती भागात स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे सन १८९८ मध्ये टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर अवघ्या चार वर्षानंतर तत्कालिन ठाणे जिल्ह्यातील महादेव कोळी राजाचे ब्रिटिश हिंदुस्तान मधील एक जून संस्थान म्हणून ओळखला जाणारा जव्हार संस्थानात सार्वजनिक श्री राम मंदिर मित्र मंडळाने १८९८ रोजी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
 
javhar44_1  H x
 
शताब्दी पूर्ण करणारा ठाणे जिल्ह्यातील दुसरा तर पालघर जिल्ह्यातील एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला धार्मिक ज्यात बालवाडीच्या मुलापासून ते थोरामोठ्यांचे धार्मिक मनोरंजन व बौद्धिक मेजवानी मिळेल अशा अनेक स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. महाराष्ट्रात जितकी जुनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत त्यामध्ये जव्हारच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे नाव आदराने घेतले जाते.
 
या मंडळाचे १२४ वे वर्ष असून जुन्या उत्सवात व आताच्या उत्सवात बदल झाले असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र थोडा ही कमी झालेला नाही. या उत्सवाने समाजाला चांगले नागरिक तयार करून दिले असून नगरसेवक ,नगराध्यक्ष , अभिनेते ,अधिकारी हे या उत्सवात घडले असून या उत्सवात लहान ते मोठ्यांचा सहभाग असतो आता कोरोनाच्या संकटकाळात अनेक निर्बंध लागू असताना यावर्षी उत्सवाने ऑनलाइन उत्सवाचे स्वरूप घेतले आहे या गणेशोत्सव सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणा द्वारे जव्हारकरांना दाखविण्याची योजिले आहे.
 
दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील अभिमानास्पद देखावे मंडळ साकारत असते मागच्या वर्षी जव्हार दर्शन व आल्या वर्षी आलिंपिक व पॅरा आलिंपिक मध्ये भारतासाठी मेडल जिंकून आणणाऱ्या खेळाडुंचे देखावे सर्वांना आकर्षित करत आहेत.
कोरोना महामारीच्या विरोधात मंडळाचा ही सहभाग असावा या हेतूने यावर्षी कोविड लसीकरण आरोग्य विभागाच्या सहकार्याने मोफत सुरू केले असून, लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ ग्रामीण भागात नागरीक घेत आहेत. मंडळाने या स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याने मोठ्या प्रमाणात मंडळाचे अभिनंदन केले जाते आहे. गणेशोत्सवाला ठाणे जिल्हा स्तरीय विशेष पारितोषिक व दरवर्षी पालघर जिल्ह्याचे आदर्श उत्सवाची प्रथम पारितोषिक गणेशोत्सव मिळवत आहे.
 
यंदा उत्सवात सामाजिक शारीरिक अंतरचे निर्बंध पाळून पण उत्सवाचे अंतःकरणातील अंतर जपून त्याच परंपरेने उत्सव साजरा होत आहे या संकटाच्या काळात संपूर्ण जगाला तारण्याची गणपती बाप्पाला विनवणी करून एक वेगळ्या पद्धतीने त्याच दिशेने सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकारणीचा मानस आहे.
 
महाराष्ट्रातील थोर मोठ्यानं दिली श्री गणेशोत्सवास भेट-
धर्मवीर आनंद दिघे,माजी खासदार चिंतामण वनगा, स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे , गीत-रामायणकार सुधीरभाऊ बाबू फडके ,विशुभाऊ बापट, माजी मंत्री विष्णु सावरा ,ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक ,माजी आमदार शिशिर शिंदे ,शिरिष कानेकर ,गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कलाकार अनंत खैरनार.
 
विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सासुरवाडी चिपळूणकर वाडा या गणेशोत्सवापासून अगदी काही पावलांच्या अंतरावर असून अज्ञातवासात असताना गणेशोत्सव दरम्यान ते या भागातच होते असे काही पुस्तकात आजही उल्लेख आढळतो त्यामुळे हा जव्हारचा राजा गणेशोत्सव हा सण स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक असा गणेशोत्सव आहे.
महाराष्ट्रातील एक जुन सार्वजनिक गणेश उत्सव त्याचप्रमाणे जव्हार संस्थान हे एक भारतातील एक जुन संस्थान आहे इसवी सन १३०६ पासून जव्हार संस्थान अस्तित्वात आहे.
जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट हे सार्वजनिक श्री गणेशोत्सव न्यासाचे अध्यक्ष असून, यात नरेश महाले, परेश पटेल, नीलेश रावळ, हितेंद्र चोथे, ललित चाफेकर, सूरज वाघ, भूषण शिरसाठ, प्रसाद अहिरे ,मनोज पवार, चैतन्य मोरे, ओमकार वाघ, पार्थ मुरतडक आदींनी मेहनत घेतली.
कोरोना निबंधामुळे आम्ही गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त भजन, गायन व तिसरी लाट येण्यापूर्वीचे नियोजन म्हणून दि. १२. १३, १५, १७ व १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून दररोज १०० कोविडशिल्ड लस देण्याचे आयोजन केले आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी लसीकरण करून घ्यावे.
- नीलेश रावळ, अध्यक्ष, सार्वजनिक श्रीराम मंदिर गणेशोत्सव मंडळ, जव्हार