संघर्ष पत्रकार संघाच्या शहापूर तालुका अध्यक्ष पदावर रवींद्र सोनावळे यांची निवड

जनदूत टिम    08-Aug-2021
Total Views |
प्रतिनिधी
किन्हवली : संघर्ष पत्रकार संघ ठाणे जिल्हा व शहापूर तालुका यांची संयुक्त मासिक सभा पार पडली असून या सभेत शहापूर तालुका अध्यक्ष पदावर लोकमत चे पत्रकार व संघाचे जेष्ठ सदस्य रवींद्र सोना वळे यांची तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तर जिल्हा कार्यकारिणीत बदल करून जिल्हा सचिव पदावर अंकुश सातपुते यांची तर जिल्हा उपाध्यक्ष पदावर जयवंत भ डांगे यांची निवड करण्यात आली आहे.
 
kinhavli5_1  H
 
संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, तालुका अध्यक्ष दिलीप वरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाची वासींद येथे संयुक्त सभा पार पडली. संघाच्या झालेल्या सभेत जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील पदांमध्ये सर्वानुमते बदल करण्यात आला असून अंकुश सातपुते यांना बढ़ती देत त्यांची जिल्हा सचिव, उपाध्यक्ष जयवंत भडांगे यांची निवड करण्यात आली.
 
संघाचे माजी तालुका अध्यक्ष दिलीप वरकुटे यांची आपल्या पदाचा राजीनामा देऊन तालुका अध्यक्ष पदी जेष्ठ सहकारी रविंद्र सोनावळे यांची निवड केली आहे. तर सचिव पदावर अंकुश भोईर, सल्लागार दिलीप वरकुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील संघर्ष पत्रकार संघ हा नोंदणीकृत संघ असून अनेक दैनिक, साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी या संघाचे सदस्य आहेत.
 
विविध सामाजिक उपक्रमात संघर्ष पत्रकार संघ अग्रेसर राहिला आहे. संघर्ष पत्रकार संघाच्या आजच्या बैठकीसाठी संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, जिल्हा सचिव अंकुश सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भ डांगे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ शिर्के, तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावळे, उपाध्यक्ष कुमार भोईर, अतुल भोईर, सदस्य गणेश वाघ उपस्थित होते.