वसई न्यायालयात लोकन्यायालयाचे यशस्वीरित्या आयोजन

जनदूत टिम    05-Aug-2021
Total Views |
पालघर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे व जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, ठाणे अनिल पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली वसई न्यायालयात रविवार दि.01 ऑगस्ट 2021 रोजी पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये दिवाणी स्वरुपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या लोकन्यायालयात दाखल व दाखलपूर्व अशी एकुण 1,154 प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली, मोटार अपघात नुकसान भरपाईच्या 18 प्रकरणामध्ये 1 कोटी 46 लाख 92 हजार भरपाई मंजुर करण्यात आली व ग्रामपंचायत क्षेत्रातील थकीत असलेली घरपट्टी एकुण 16 लाख रुपयांची तडजोड करण्यात आली.
 
vasai55_1  H x
 
लोकअदालतीच्या आयोजन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश-1 तथा अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती, वसई सुधीर देशपांडे यांनी लोकांनी आपसातील असलेले किरकोळ स्वरुपाचे दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक वाद प्रकरणे व समज-गैरसमज अशा काही करणांमुळे दुभंगलेले संसार अशी प्रकरणे समोपचाराने मिटविण्यासाठी लोकन्यायालय हे उत्तम साधन असुन नागरिकांनी या संधीचा प्रत्येक लोकअदालतीत तसेच पुढील लोकअदालतीची लगेचच तयारी सुरु झाली असुन जास्तीत जास्त पक्षकारांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
लोकन्यायालय यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालय येथील सर्व न्यायाधीश, वकील वर्ग, अधीक्षक व्हि. एस. ढवळ व वसई तालुका विधीसवा समितीचे लिपीक एस.बी. राठोड व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.