आरसी इलेक्ट्रॉनिक्स चैन्स ऑफ स्टोर्स कडून पूरग्रस्त भागात भरीव मदत

नरेश पाटील    05-Aug-2021
Total Views |
माणगांव : मुबंई, नवीमुंबई,रायगड,नाशिक तसेच ईतर 22 ठिकाणी शाखा असलेल्या राज्यातील नामांकित "आरसी इलेक्ट्रॉनिक्स" च्या वतीने कोकणात पूरग्रस्त खेडो पाडी भागात मोठ्ठया प्रमाणाने पीडित ग्रस्त यांना मदतीचा वाटप करण्यात आले आहे.
 
rc_1  H x W: 0
 
यात प्रामुख्याने जेवण देणे,बिसलेरी पाणी 700 बॉक्स,भांडी,बिस्कीट् पुडे,कपडे, तसेच कपडे धुण्यासाठी लागणारी वस्तू, रेशन किट, घरात साफसफाईचा साहित्य, मास्क, सॅनिटायजर, चटाई, गादी, मेणबत्ती, माचीस, सेनिटरी वस्तू, अंतरवस्त्र, अंघोळीचे साबण, टूथपेस्ट.... असे नाना वस्तू देण्यात आले आहे.त्याच बरोबर येत्या काही दिवसात या पूरग्रस्त भागात आरोग्य शिबीर तसेच गाव दत्तक घेण्याचे मानस असल्याचे विषय समोर आले आहे.
 
ही सर्व मदत अति दुर्गम भागात संकष्टीचा दिवशी म्हणजे मंगळवारी दि 27 जुलै तसेच तीन ऑगस्ट 2021 रोजी काळीज कोंड,काळीज आदिवासी वाड्यात,भिरवाडी, राजेवाडी, नांगलवाडी तसेच तळीये येते वाटप करण्यात आले. ही सर्व वाटप 'आरसी इलेक्ट्रॉनिक्स' च्या मालक श्री.देव शर्मा आणि विमल शर्मा यांचा सेवाभावी पुढाकारणे तात्काळ करण्यात आले.
 
या कामी आरसी इलेक्ट्रॉनिक्सच्या महा व्यवस्थापक मनोज मेथयू यांचा मार्गदर्शन खाली तसेच मनोज चौधरी आणि माणगांव आरसी इलेक्ट्रॉनिक्स स्टोरचा मॅनेजर संतोष चंद्रकांत सुर्वे व सर्व स्थानिक कर्मचारी असा सर्वजण मिळून पूरग्रस्त भागात अहोरात्र काम करीत असल्या बद्दल आमच्या जिल्हा प्रतिनिधीस माणगांव शहर येते असलेल्या या दुकानाचा बाहेर एकूण चार ते पाच टेम्पो मुंबई येतुन सर्व महापुरात बाधित झालेल्या कुटुंब यांना जीवनावस्तू पुरवठा होण्याकरिता शॉर्टींग होत असल्या बाबतीत दिसून आले आहे.ही मदत येत्या अनेक दिवस असणार म्हणून एकंदरीत कामाचा नियोजनातून दिसून येत आहे.