जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सौर दिव्याचेवाटप वाटप करत तांबडमाळ येथील ग्रामस्थांचे जीवन केले प्रकाशमय

पारस सहाणे    04-Aug-2021
Total Views |

  • ताबंडमाळ गावाने मानले शिवसेनेचे आभार

जव्हार : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आसे ग्रामपंचायत मधील बिवल पाडा तांबडमाळ येथील ग्रामस्थांना दि २७ जुलै वार मंगळवार रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या माध्यमातून सौर दिव्याचे वाटप करण्यात आले.या गावातील कुठल्याच घरात वीज नव्हती त्या सर्व घरांना सौर दिव्याचे वाटप करून सगळ्यांच्या घरात प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली.
 
javhar8_1  H x
 
तसेच या तांबडमाळ गावातील विकास नावाच्या एका कलाकाराने "मधली सुट्टी" ह्या शॉर्ट फ्लिम मध्ये काम केले होते.त्याच्या घरात सुद्धा वीज नव्हती त्या कलाकाराच्या घरात सुद्धा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या माध्यमातून सौर दिवे देण्यात आले. त्यामुळे तांबडमाळ या गावातील लोकांनी शिवसैनिक व शिवसेनेचे आभार मानले.
 
आम्हाला गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात जीवन जगाव लागत होते.परंतु आज शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्या माध्यमातून सौर दिव्याचे वाटप करण्यात आल्याने आमचे जीवन प्रकाशमय बनले असे येथील ग्रामस्थ म्हणाले.याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील, उपतालुकाप्रमुख वासुदेव खंदारे, पंचायत समिती सदस्य भास्कर थेतले,नगरसेवक देविदास काकड ,शिवसैनिक अमोल जाधव,ईश्वर कोकाटे,पांडुरंग तुंगार ,नितीन तामोरे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिक्षक सेनेच्या वतीने वृक्ष लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली.