सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्याकडून पूरग्रस्त/दराडग्रस्तांना मदत

जनदूत टिमविठ्ठल ममताबादे    04-Aug-2021
Total Views |
उरण : उरण तालुक्यातील सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे आणि प्रजापिता ब्रमहकुमारी ईश्वरीय विद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामस्थ मंडळ कळंबुसरे आणि सहयोग स्नेह सेवा संस्थान यांच्या सहकार्याने महाड पोलादपुर तालुक्यातील पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी मदत करण्यात आली.
 
uran44_1  H x W
 
यामध्ये पोलादपूर तालुक्यातील केवणाले आणि साखर सुतारवाडी या दराडग्रस्त गावांना मदत करण्यात आली तसेच पोलादपूर तालुक्यातील साखर आदिवासी वाडी,तुर्भे आणि महाड तालुक्यातील खरवली आणि ढालकाठी या पूरग्रस्त गावांना मदत करण्यात आली. या संस्थांमार्फत ५३३ धान्य किट, ५०० मेणबत्ती बॉक्स, ८० पाणी बॉटल बॉक्स,५०० अंगाचे साबण, बिस्किटचे ७० बॉक्स,कपडे आणि भांडी यांचे वाटप करण्यात आले.
 
पत्रकार मिलिंद खारपाटील, प्रजापिता ब्रमहकुमरी ईश्वरीय विद्यालय पनवेल चे अशोक पिंगळे, धर्मेंद्रसिंग प्रधान, सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशनचे नंदकुमार तांडेल, प्रभुश्र्वर म्हात्रे,सचिन भोईर,नयन म्हात्रे,तेजस पाटील,हरिभाऊ पाटील,हेमंत चाळके,अरुण पाटील यांनी हे वाटप केले. आपदग्रस्तांना मदत करणाऱ्या या संस्थांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समाजसेवी वृत्तीचे पनवेल आणि उरण परिसरात कौतुक होत आहे.