फौजदार दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 (1)(3) प्रमाणे मनाई आदेश (सुधारणा)

जनदूत टिम    04-Aug-2021
Total Views |
ठाणे : जागतीक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात व ठाणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोविड.19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13/03/2020 रोजी पासून लागून खंड 2, 3, व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहेत. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.
 
lock_1  H x W:
 
महाराष्ट्र शासन नोटीफिकेशन कं. डीएमयु/2020/सीआर./92/आपत्ती व्यवस्थापन-1 दि. 04/06/2021 अन्वये लेवल्स ऑफ रिस्ट्रीक्शन्स फॉर ब्रेकींग द चेन आदेश घोषीत केला आहे. तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. कोरोना 2021/सी.आर.366/आरोग्य-5, दि. 02/08/2021 नुसार सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सदर सुधारीत आदेशानुसार निर्बंधामध्ये पुढील प्रमाणे अंशत: बदल केले आहेत. त्याअनुषंगाने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 खालील तरतुदीच्या अनुषंगाने जनतेस खालील व्यक्ती आस्थापना यांना उददेशून आदेश काढणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री झालेली आहे.
 
महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग-1 मध्ये उप-विभाग यांचे कडील अधिसूचना क्रमांक 3 मधील पान क्र. 4 मधील भारतीय दंड प्रक्रिया संहिता 1973 चा-क्र-एमएससी-1274/व्ही-एफ मधील आदेशाने भारतीय दंड प्रक्रिया संहिता 1973(II 1974) चे कलम 21 अन्वये यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करुन कलम 144 चे विशेष अधिकारी प्रदान केलेले आहे.
पोलीस आयुक्त, ठाणे शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दि.01/04/1974 चे अधिसूचनेद्वारे प्राधिकृत अधिकारी, म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदार प्रक्रिया संहिता कलम 144(1)(3) अन्वये जा.क्र.वि.शा./कोरोना/मनाई आदेश/2899/2021, दि. 23/07/2021 अन्वये काढण्यात आलेला मनाई आदेश रद्द करण्यात येत असून, महाराष्ट्र शासन निर्णय दि. 02/08/2021 नुसार सुधारीत मनाई आदेश दिनांक 04/08/2021 चे 00.01 ते 30/08/2021 चे 24.00 वा. चे दरम्यान लागू करीत आहे.
 
अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस 22.00 वाजेपावेतो चालू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री 22.00 वाजेपावेतो चालू राहतील व रविवारी बंद राहतील. मात्र शॉपींग मॉल्स पुर्णत: बंद राहतील. मेडीकल व केमिस्ट शॅप्स सर्व दिवस पुर्ण वेळ चालू राहतील. रेस्टॉरंट/हॉटेल 50 टक्के बैठक क्षमतेने सोमवार ते शनिवार दुपारी 16.00 वाजेपावेतो सुरु राहतील. रविवारी बंद राहतील. पार्सल व टेक-अवे सुविधा आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेप्रमाणे चालू राहील.
 
व्यायामशाळा, योग-वर्ग, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर इत्यादी व स्पा 50 टक्के क्षमतेचे सोमवार ते शनिवार रात्री 22.00 वाजेपावेतो सुरु राहतील आणि रविवारी बंद राहतील. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळास संबंधित महानगरपालिका/नगरपालिका/स्थानिक प्राधिकरण यांनी नियमित केलेल्या वेळेनुसार परवानगी असेल. सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने हे केवळ व्यायाम, चालणे, धावणे व सायकलींग याकरिता सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपावेतो चालू राहतील. सर्व शासकीय व खाजगी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील. सर्व कृषी विषयक सेवा, बांधकाम उद्योग,औद्योगिक सेवा, मालवाहतूक सेवा नियमितपणे चालू राहतील. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. चित्रीकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी राहील.
वरील शिथील केलेल्या निर्बंधा व्यतिरिक्त शासनाकडील दि. 04/06/2021 रोजीचे आदेशातील स्तर-3 चे खालील निर्बंध पुर्ववत लागू राहतील.
 
उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बहन्मुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. सामाजिक/राजकिय/सांस्कृतीक मेळावे, निवडणूका, निवडणूक प्रचार, निवडणूक बैठका 50 टक्के बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 16.00 वाजेपावेतो घेता येतील. लग्न समारंभ फक्त 50 लोकांच्या मर्यादेतच करता येईल. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थित करता येईल. ई-कॉमर्स सेवा पुर्वी प्रमाणे नियमित सुरु राहतील. सार्वजनिक परिवहन सेवा 100 टक्के बैठक क्षमतेने सुरु राहतील. परंतु प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
 
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंडा विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल. उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधीत आयोजक तसेच आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्री नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसारमाध्यमे, पोलीस स्टेशन, सहा. पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पो.उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदरचा आदेश हा माझ्या सही शिक्यानिशी आज दि. 03/08/2021 रोजी दिलेला आहे. असे जय जीत सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी कळविले आहे.