खातिवली गावात झाले कोविड लसीकरण शिबीर...

जनदूत टिम    04-Aug-2021
Total Views |

  • एका शिक्षकाचा अभिनव उपक्रम

खातिवली : कोविडलसीचा तुटवडा सर्वत्र असतांना गावातील लोकांचे आरोग्य निरोगी व कोरोना पासून संरक्षित व्हावे. यासाठी शिक्षक एकनाथ तारमळे सर यांनी गावातील नागरिकांच्या सहकार्याने समिती तयार करून व डोस देणगीदार यांची मदत घेवून रविवार दि. १ ऑगस्ट रोजी खातिवली येथे एक कोविशिल्ड डोस आरोग्यासाठी.. या शीर्षकाने १०२ लोकांचे लसीकरण करून घेतले. त्यात ७९ लोकांना पहिला डोस,तर २३ लोकांना दुसरा डोस देण्यात आला. विशेष म्हणजे जेष्ठ नागरिकांसाठी राखीव डोस ठेवण्यात आले होते.
 
khativali_1  H
 
लस उपलब्ध होत नसतांना कोविड लसीकरण समितीचे प्रमुख तारमळे सरांनी वयोगट ४५ च्या वर वय असणाऱ्या ६० ग्रामस्थांना सरकारी दवाखाना, वासिंद येथे रजिस्ट्रेशन करून टोकन मिळवून दिले. विनासायास त्यांनाही लस मिळाली.खातिवली येथील जिल्हा परिषद शाळा येथे हे कोविड मोफत लसीकरण शिबिर घेण्यात आले. कोविशिल्ड ही लस देण्यात आली.
 
शिबीराची वेळ- स. ९.३० ते सायं.५ वा. पर्यंत होती. शिबीराचे उद्घाटन मा. सौ. तरूलता धानके मँडम, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर व मा. डॉ. कल्पेश तारमळे, निरामय हॉस्पिटल, वासिंद यांचे हस्ते करण्यात आले. त्यांना ग्रामस्थांनी ही चांगला प्रतिसाद दिला. लस दात्यांमध्ये किरण जाधव, साईनाथ काबाडी, चिंतामण जाधव,प्रफुल्ल महाजन, मनोहर भोईर,(पोलीस), ओमसाई सेवा प्रतिष्ठान,दिपक सपाट,अनिल कोर,निनावी डोस काहींनी दिले. चेतन जाधव यांनी पाणी व्यवस्था व वैश्य युवक मंडळांने बैठक व्यवस्था केली. खातिवली येथे सरकारी दवाखाना म्हणजे उपकेंद्र सुरू करावे व ज्यांना आज लस देता आली नाही. त्यांना वासिंद येथे खातिवलीसाठी स्वतंत्र दिवस देण्यात यावा. अशी मागणी तारमळे सरांनी केली. तर डॉ. तरूलता धानके यांनी हा उपक्रम चांगला असून गावोगावी अशी शिबीरे होणे गरजेचे आहे.
 
उपकेंद्रासाठी प्रस्ताव सादर करावा व ज्यांना आज लस मिळाली नाही. त्यांना वासिंद येथे स्वतंत्र दिवशी लस देण्याची व्यवस्था करण्यात येईल. असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मी लस घेतली आहे. हा सेल्फी पॉईंट सुद्धा ठेवण्यात आला होता.शिबीर यशस्वी होण्यासाठी चिंतामण जाधव,प्रशांत महाजन, किशोर भोईर, भास्कर जाधव,दिपक सपाट,डॉ. किरण काबाडी, अनिल गगे, प्रदीप महाजन, सुशांत गाठे , अनिल कोर, महेश कोर, जगदीश काबाडी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
कोविड लसीकरण समिती तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.