सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 10% आरक्षणामधून नियुक्त्या

जनदूत टिम    03-Aug-2021
Total Views |
ठाणे : ग्रामपंचायतमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार जिल्हा परिषद सेवेतील वर्ग - ३ व वर्ग - ४ च्या पदावर १०% आरक्षणाच्या नियमानुसार समाविष्ट करण्यात आले. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या देण्यात आल्या.

Thane5_1  H x W 
 
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनाद्वारे लगेचच नियुक्ती आदेशही जारी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, समाज कल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरें, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, आदी मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
 
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जेष्ठता सुचिनुसार व शैक्षणिक पात्रतेनुसार एकूण 7 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवा वर्ग 3 या संवर्गामध्ये 6 ग्रामसेवक व 1 वरि. सहा. लेखा या पदावर नियुक्ती देण्यात आल्याचे ग्रामपंचायतचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सांगितले.