बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने कडून महाड येथील पूरग्रस्त कर्मचारी यांना मदत वाटप

नरेश पाटील    03-Aug-2021
Total Views |
माणगांव : कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महाड आणि चिपळूण येथे पोहचले. तेथील बांधवांना रोजच्या वापरासाठी कपडे, पिण्याचे पाणी, फिनेल, साबण टुथब्रश, टुथपेस्ट, बिस्किटे यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.
 
mahad4_1  H x W
 
महाड आणि चिपळूण येथील प्रत्येकी १०० कुटुंबांना अशी एकुण २०० कुटुंबांना संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख कार्याध्यक्ष गुलाबराव पवार, कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी यांचेसह रायगड जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप नागे आणि सरचिटणीस प्रभाकर नाईक यांच्या हस्ते महाड येथील पुरग्रस्त कर्मचारी यांना वाटप करण्यात आले आहे.
 
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक ज्येष्ठ राष्ट्रीय कामगार नेते स्वर्गीय र.ग. कर्णिक साहेबांनी घालून दिलेल्या सामाजिक बांधिलकीच्या आदर्शानुसार जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. मध्यवर्ती संघटनेने आजवर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहकार्याचा हात पुढे केला आहे. या मध्यवर्ती संघटनेचा मुंबई जिल्हा सरकारी कर्मचारी संघटना हा कणा असुन प्रत्येक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे अशीच महापुराची परिस्थिती उद्भवली होती तेंव्हा संघटनेने कपडे आणि इतर आवश्यक वस्तू तातडीने पुरविल्या होत्या.
 
महाड येथील पुरग्रस्त कर्मचारी यांना मदत वाटप करताना जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, तालुका अध्यक्ष सतिश माने, सरचिटणीस रविंद्र भोसले, समीर जाधव, आशिष अमृसकर, लक्ष्मण लहांगे, सुभाष भोसले, स्वप्नाली गांधी, प्रमोद मालवी, तसेच माणगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते. मुंबई जिल्हा संघटनेने केलेल्या मदतीचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांनी विशेष आभार व्यक्त केले आहे.