नविन पनवेल रेल्वेस्थानकाजवळील मंगलमुर्ती रोज बाजारात महापालिकाच्या आशिर्वादाने पदपथावर होतेय खाद्य पदार्थाची विक्री

विठ्ठल ममताबादे    02-Aug-2021
Total Views |
उरण : नागरिकांना कोणताही अडथळ नसलेले आणि मोकळेपणाने चालता येईल असे फूटपाथ मिळणे हा नागरिकांचा घटनात्मक हक्क आहे.तसेच नागरिकांना सुस्थितील रस्ते देण्याबरोबरच अडथळामुक्त आणि देखभाल होत असलेले फूटपाथ पुरवणे हे महापालिकाचे घटनात्मक कर्तव्य आहे.
 
panvelll3_1  H
 
सिडकोमधील करदात्या नागरिकांना दररोज विविध समस्यांचा सामना करावा लागत असताना ही महापालिका अधिकार्‍याकडून या समस्या सोडविल्या जात नाही नविन पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सेक्टर 17 येथे मंगलमुर्ती रोज बाजाराने बेकायदेशीर खाद्य पदार्थाच्या विक्रेत्यांनी फुटपाथवर सुध्दा कब्जा केला आहे .महापालिका अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांच्या लागेबांध्यामुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरण दिसत असल्याने येथे कुठलीच कारवाई होत नाही. त्यामुळे येथिल चाकरमानी ,जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहे. या टपर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उघड्यावर खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. फुटपाथवर सायंकाळी हे टपरीवाले दुसरे धंदे लावतात तसेच फुटपाथवर तसेच महावितरण सबस्टेशनजवळ बेकायदेशीर ज्वलशील वस्तू वापर करतात त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचा वापर सार्वजनिक ठिकाणी सर्रास केला जातो.
 
कधी सिलिंडरचा स्फोट झाला आणि जिवीतहानी झाली तर महापालिका अधिकारी याची जबाबदार घेतील? असा प्रश्‍न येथिल नागरिकांचा विचारत आहे.येथिल फुटपाथवरच खाद्यपदार्थ खाण्यासाठी खुर्च्या ही पदपथावर ठेवल्या जातात. त्यामुळे पदपथावर चालणार्‍या नागरिकांना जिव मुठीत घेऊन येथून चालावे लागते. या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे महापालिकेचा कोणताही परवाना नसतात फूटपाथवर इडली सांबर, डोसा, मिसळपाव,भेळपुरी,चायनिज,वडापावची विक्री केली जाते.या मार्केटमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहे. येथिल फूटपाथवर सांयकाळी वडापाव,चायनिज खाण्यासाठी नागरिक गर्दी करत असून पदपथावर रात्री कचरा टाकला जातो.तसेच आजुबाजूच्या गटारीत घाण टाकत असल्याने या परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे.तसेच समोरील सिडको उद्यानातून पाणी आणून पदपथावरच खाद्यपदार्थ बनविले जातात.अस्वच्छ व गर्दीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला.तसेच रात्री 12 वाजेपयरत हे स्टॉल सुरू असतात अनेकांनी हे स्टॉल 15 ते 20 हजार रुपायांनी भाडेतत्त्वावर दिले आहेत.
 
या टपर्‍यावर राजकिय वरदहस्त असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जाते. महापालिका अतिक्रमण विभागाची गाडी आली की रस्त्यावरील गरिबांच्या टोपल्या उचलतात पण या मार्केटवर कारवाई करत नाही. महापालिकाचे अतिक्रमण विभाग अपंग ,चर्मकार स्टॉलवर कारवाई करते मग अशा स्टॉलवर कारवाई का करत नाही महापालिकेने अशा बेकायदेशीर खाद्य पदार्थाच्या विक्रेत्यांवर तसेच तेथिल मंगलमुर्ती मार्केटवर कारवाई करावी अशी मागणी येथिल नागरिक करत आहेत.