ग्रामपंचायत कुकसे सरपंचपदी कमला पाटील यांची निवड

रविंद्र पालवी    16-Aug-2021
Total Views |
भिवंडी ग्रामीण: अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत कमला जनार्दन पाटील यांची भिवंडी तालुक्यातील कुकसे ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
 
bhi5_1  H x W:
 
ग्रुप ग्रामपंचायत कुकसे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची व आर्थिक दृष्ट्या सधन मानली जाते. सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे तत्कालीन सरपंच भरत पाटील यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी कमला पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने, त्यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष अधिकारी आर.बी भोसले यांच्याकडून करण्यात आली. या बिनविरोध निवडणुकीत मावळते सरपंच भरत पाटील, उपसरपंच निलम भोईर, सदस्या चित्रा माळी, योगिता पारधी, संगिता माने, तुकाराम फिरंगणे, मनोहर भोईर, निलेश देसले यांनी सहभाग नोंदवला.
 
यावेळी तालुकाप्रमुख विश्वास थळे, माजी आमदार रुपेश म्हात्रे, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोन्या पाटील, सभापती -सहकार सोसायटी पडघे श्रीकांत गायकर,सभापती रवि पाटील, उपसरपंच योगेश पाटील, कुरुंद सदस्य भाई पाटील, शिवसेना सचिव राजेंद्र काबाडी, दिपक पाटील, जय भगत, उपतालुकाप्रमुख अॅड.शशिकांत गोतारणे, कृष्णा वाकडे, माजी सरपंच श्याम पारधी, दिलीप धर्मा पाटील, पं. स. सदस्य एकनाथ पाटील, माजी सभापती विकास भोईर ग्रामसेवक राजेश सालवे, नवनिर्वाचित सरपंच कमला पाटील यांचे अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या .