रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा

जनदूत टिम    16-Aug-2021
Total Views |
शहापूर : ठाणे महानगरपालिकेचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक शैलेश मनोहर पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात ह्या वर्षी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव व रक्तानंद सेवा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष कु. गणेश धोंडू चौधरी यांच्या वतीने ग वि खाडे विद्यालय शहापुर येथे भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन प्रेरणा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भांगरे साहेब व धर्मवीर युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ धिर्डे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

blood55_1  H x
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेषतः महिलांनीही ह्या रक्तदान शिबिरात सहभाग दर्शवला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना एक छत्री, सन्मानचिन्ह, मास्क भेट वस्तू म्हणून देण्यात आले तसेच ५ पेक्षा अधिक वेळ रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच रक्तदान शिबिरास आलेल्या संकल्प ब्लड बँक च्या सर्व कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी पी. पी. ई किट पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. आत्तापर्यंत गणेश चौधरींच्या रक्तानंद सेवा ग्रुपची चार रक्तदान शिबिरे झाली असून ६० अधिक रुगांना रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या सहकार्याने ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक जिल्ह्यासह अनेक रुग्णालयात मोफत रक्ताची पूर्तता केली आहे. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून गणेश चौधरींच्या व सोमनाथ धिर्डे यांच्या रक्तानंद सेवा ग्रुप, धर्मवीर युवा प्रतिष्ठान च्या कार्याच कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

bloodd5_1  H x
 
यावेळी या कार्यक्रमास प्रेरणा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भांगरे साहेब, धर्मवीर युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ धिर्डे साहेब, समाजसेवक राजेश पडवळ, संजय लोणे, घुडे साहेब, महाराष्ट्र पोलिस सुधीर शिंदे सर, भाजपचे नेते राजेश घागस, समाजसेवक दिनेश चंदे, रमेश निचिते, भाजपचे युवानेते गणेश धसाडे, चिंतामण फर्डे भाऊसाहेब, समाजसेवक किशोर खाटेकर, नितीन भेरे सर, राष्ट्रवादी चे युवानेते श्रीकांत चौधरी, युवानेते भगवान निमसे, रवींद्र लिहितकर सर, भाजपचे युवानेते संदेश निचिते, युवानेते अमोल घोडविंदे, इशू निचिते, धर्मवीर युवा प्रतिष्ठान चे संपर्क प्रमुख पंढरीनाथ ढमके, उद्योजक अक्षय विशे, गौरव शिंदे, अक्षय शिंदे, राजेश ढमके, किरण ढमके, मधुकर ढमके, उद्योजक भावेश ठाकरे, नितीन निचिते, नितीन फर्डे, कौशल गोरले, सागर सदगीर, अरुण बोन्द्रे, विकास चौधरी, लोकेश धनगर, प्रमोद विशे, जगदीश निचिते, योगेश धामणे, मधुकर निचिते, अरुण निचिते, दिलिप निचिते, कुणाल भालके, सुनिल सासे, राज ठाकरे, अजय निचिते, जयेश निचिते तसेच धर्मवीर युवा प्रतिष्ठान, रक्तानंद सेवा ग्रुप, विविध सामाजिक संघटना, ग वि खाडे विद्यालय चे कर्मचारी, ग्रामस्थ मंडळ शहापुर इ मान्यवर उपस्थित होते. यापुढेही रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबीर विविध ठिकाणी धर्मवीर युवा प्रतिष्ठान व रक्तानंद सेवा ग्रुप यांच्या वतीने राबवली जातील असे गणेश चौधरी यांनी सांगितले. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक जयेश भालके सर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्याताई वेखंडे, राजेश जागरे सर, तळपडे सर, प्रेरणा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भांगरे साहेब, समाजसेवक दत्तात्रेय वरकुटे साहेब, उद्योजक राजू शेठ ठक्कर, महाराष्ट्र पोलिस संतोष चौधरी, युवानेते गणेश शेठ धसाडे, समाजसेवक किशोर खाटेकर, उपसरपंच एकनाथ कोर, उपसरपंच रघुनाथ पांढरे, रविंद्र लिहितकर सर, युवानेते संदेश शेठ निचिते, समाजसेवक कृष्णा गोडांबे, रघुवीर भारती, तुषार देसले, मुकेश देवासी, मनोज साबळे, गुरुनाथ वेखंडे, मनोज वेखंडे, दिपक चंदे, महाराष्ट्र पोलिस शेखर तारमळे, महाराष्ट्र पोलिस प्रविण मोगरे, अजय किरपण (आर्मी), युवानेते महेंद्र आरज, युवानेते रोशन पवार, निशांत हरड, तानाजी मिरकुटे, विनोद मांजे, परेश रणदिवे, जयवंत शेरे, अनिल महालुंगे, संकल्प ब्लड बँक, प्रभात ग्राफिक्स ग वि खाडे विद्यालय, सर्व सन्मानीय पत्रकार बांधव, धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, रक्तानंद सेवा ग्रुप, विविध शैक्षणिक राजकीय सामाजिक संघटना यांनी विशेष सहकार्य केले.