वसई तालुका ग्रामीण काँग्रेसची कार्यकारिणी बैठक

जनदूत टिम    12-Aug-2021
Total Views |
वसई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ताकदीने लढविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक तालुका निहाय कार्यकारिणी बैठका सुरू असून वसई तालुका ग्रामीण काँग्रेसची बैठक नुकतीच काँग्रेस भवन येथे पार पडली.
 
vasai55_1  H x
 
वसई तालुका ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिवाकर पाटील, जिल्हा प्रभारी संतोष केणे, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉमाणिक डिमेलो यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पक्षाने दिलेला 'व्यर्थ न हो बलिदान' हा कार्यक्रम जोमाने राबविण्याबाबत व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढविण्यासाठी बूथ कमिट्या बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन जिल्हा प्रभारी संतोष केणे यांनी केले. जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील व ज्येष्ठ नेते डॉमाणिक डिमेलो यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
 
तालुका अध्यक्ष राम पाटील यांनी तालुक्यातील सध्याची पक्षाची स्थिती आणि अडचणी मांडताना तालुक्यात पक्षसंघटना बळकटीसाठी वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी वेळ द्यावा आणि शासकीय समिती व विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्या तातडीने कराव्यात अशी आग्रही मागणी केली.बैठकीस जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिकंदर शेख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष असिफ मेनन, महेश देसाई, मनोज पाटील यांसह तालुका काँग्रेसचे गणेश पाटील,सुनीता लेमॉस, प्रसाद चव्हाण, संदीप कनोजिया, प्रिन्सली घोणसाळविस, अश्रफ अली, निखिलेश उपाध्याय, अमित नाईक, कुंदन राऊत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.