जनक विशे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप

जनदूत टिम    12-Aug-2021
Total Views |
ठाणे : धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सक्रिय सदस्य श्री.जनक विशे हे आपल्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम रावबत असतात.
 
th_1  H x W: 0
 
यावर्षी सुद्धा आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या लेनाड गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या व पेन वाटपाचा त्यांनी मानस ठेवला होता आणि तो त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने शाळेतिल विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करुण पूर्ण केला यावेळी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.सोमनाथजी धिर्डे साहेब, सचिव श्री.गणेश चौधरी,संपर्कप्रमुख श्री.पंढरीनाथ ढमके,शाळेचे कमिटी अध्यक्ष श्री.शंकर सापळे,श्री.निवृत्ती विशे,धर्मवीर युवा प्रतिष्ठान सदस्य कु.विकी शेवाळे,मनिष विशे,मयुर भोईर,करण वाळिंबे,राहुल विशे उपस्थित होते.
 
यावेळी जनक विशे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना एक गोड भेट म्हणून धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या शहापुर तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद लेनाड शाळेचे शिक्षक श्री.सुधीरजी बागराव सर व बांगर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व जनक विशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.