शहापूर ग्रामीण भागात पुराच्या पावसामुळे शेतीचे नुकसान

जनदूत टिमअविनाश जाधव    12-Aug-2021
Total Views |
शहापूर : शहापूर तालुक्यात ग्रामीण भागात शेतीचे नुकसान झाले असून बांधबंदिस्ती वाहून गेली असून भाताचे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
 
sheti411_1  H x
 
शहापूर तालुक्याच्या महसूल व ग्रामपंचायत विभागाच्या वतीने पुरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून लवकरात लवकर मदत मिळावी.वासींद, साने,पाली,सारमाळ,दहागाव,शेई, शेरे, खतीवली वेहलोळी अशा गावांना मोठ्या प्रमाणात भात शेतीची हानी झाली असून त्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहून गेलेले भाताचे रोप फुटलेले बांध व शेतीत जमा झालेला गाळ यांच्या अनुषंगाने योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
 
अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आलेला होता त्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून महसूल ,कृषी व पंचायत समिती यांनी संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.शहापूर तालुक्याच्यावतीने ९० गावातील शेतीचे पंचनामे सुरू आहेत.ज्या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान होऊन पंचनामे केले नाही त्यांनी तहसीलदाराकडे तक्रार करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्तेकडून करण्यात येत आहे.गावागावात झालेले शेतीचे नुकसान लवकरात लवकर पंचनामा करून शासनाने शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा.