वृक्षारोपणासोबत वृक्षांचे संवर्धन करा- माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आवाहन

जनदूत टिम    07-Jul-2021
Total Views |

  • डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त मोहोने टिटवाळा मंडळात वृक्षरोपणाला वाढता प्रतिसाद

कल्याण : पर्जन्यमानात दिवसेंदिवस घट होत असून वृक्षरोपण हा त्यावरील उपाय आहे त्यामुळे वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती व स्मरण सप्ताह निमित्त मोहोने टिटवाळा मंडळातील प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १५ तसेच नांदप गावात नरेंद्र पवार यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
 
naree44_1  H x
 
प्रभाग क्र. १० टिटवाळा येथे उमिया पॅरेडाईझ सोसायटी समोर तलाव शेजारील परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर सौ. उपेक्षा भोईर, ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, वार्ड अध्यक्ष किरण रोठे, बजरंग अग्रवाल,मंडळ सरचिटणीस अनंता पाटील, उपाध्यक्ष अमोल केदार, वैभव पुजारी, अनिरुद्ध राणे,साई दलाल, विशाल किस्मतराव, विकास बुचडे, रितेश माळी, वनविभागाचे बेनके आदी कार्यकर्ते, प्रभाग क्र.११ बल्याणी येथे डोंगरवाली मय्या माता मंदिर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित बाबा चंद्रलाल दलानी,मंडळ सरचिटणीस संतोष शिंगोळे व अनंता पाटील,महिला आघाडी अध्यक्षा सौ.मनिषा केळकर, सरचिटणीस महिला मोर्चा सरला गुणशेखरण, वार्ड अध्यक्ष विनायक भगत, अनुसूचित जातीजमाती मंडळ अध्यक्ष संदीप गायकवाड, हेमंत गायकवाड, उपाध्यक्ष मुन्ना रईस व शशिकांत पाटील, सौ. लक्ष्मीताई आहिरे, मोहीली गावचे पोलिस पाटील अशोक म्हात्रे, मोहीली गावातील महिला बचत गट तसेच ग्रामस्थ वर्ग जास्तीत जास्त आदी. पदाधिकारी प्रभाग क्र.११ बल्याणी येथे सरनोबत नगर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात माजी नगरसेवक बुधाराम सरनोबत, सौ.अंजना बु. सरनोबत, बजरंग अग्रवाल, नवनाथ सुतार, मंडळ सरचिटणीस अनंता पाटील, वार्ड अध्यक्ष विनायक भगत, हेमंत गायकवाड, सौ.लक्ष्मीताई आहिरे आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते, नांदप ग्रामपंचायत येथे गणेश नगर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात सरपंच अनंता शेलार, कल्याण ग्रामीण उपाध्यक्ष बाळाराम शेलार, ठाणे ग्रामीण किसान मोर्चा अध्यक्ष जयराम भोईर, कल्याण ग्रामीण सरचिटणीस चिंतामण मगर, जिल्हा परिषद सदस्य सौ. रेश्मा मगर, कल्याण पंचायत समिती सदस्य सौ.रेश्मा भोईर, अरविंद शेलार, योगेश शेलार, उत्तम शेलार, मोतीराम शेलार आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रभाग क्र.१२ गाळेगांव येथे गावदेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित होतो. यावेळी वार्ड अध्यक्ष अनंता पाटील, सौ.अपर्णा पाटील, सतीश जनार्दन पाटील, युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्ष सूरज सुतार, दिवाकर सर, महेश पाटील आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रभाग क्र.१५ मधील शहाड येथील वृक्षारोपण कार्यक्रमात सौ.मनिषा केळकर, वार्ड अध्यक्ष मोहन कोनकर, वार्ड महिला आघाडी अध्यक्षा सौ.वर्षा सुतार, सुवर्णा कोनकर उपस्थित होते. मोहने येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्वछता करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.