जिवन प्राधिकरणची सुबेना आता 1.5 कोटी ची कामे मिळणार

जनदूत टिम    05-Jul-2021
Total Views |
ठाणे : महाराष्ट्र जिवन प्राधिकरणातर्फे सू.बेरोजगार अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम विभागा सारख्या सवलती तथा वर्गीकरणात वाढ मिळावी म्हणून वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले परंतू त्यात यश आले नव्हते परंतू जेव्हा सदस्य सचिव पदी आदरणीय किशोर राजे निंबाळकर साहेब विराजमान झाल्याचे समजल्यावर मा.आ.सतीशभाऊ चव्हाण व MEA चे राज्याध्यक्ष इंजि.प्रदिपभाऊ पडोळे यांच्या नेतृत्वाखालील 23 फेब्रुवारी 2021 रोजी मा.ना.गुलाबराव पाटील (ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री) व आदरणीय किशोर राजे निंबाळकर साहेब, सदस्य सचिव, म.जी.प्रा. यांना भेटून सू.बेरोजगार अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत अवगत करून निवेदन सादर केले.
 
sube_1  H x W:
 
आणि त्याबाबत आदरणीय किशोर राजे निंबाळकर साहेबांनी तात्काळ दखल घेत मे 2021 मध्ये झालेल्या Board meeting मध्ये सू.बेरोजगार अभियंत्यांना 150 लक्षचे नोंदणीकरण देणे बाबदचा ठराव मंजूर करून घेतला. सू.बेरोजगार अभियंत्यांना 150 लक्षचे नोंदणीकरण देण्याबाबतचे परिपत्रक/शासन निर्णय काढत असल्याचे समजल्यावर कोरोना प्रादुर्भावमूळे MEA चे महासचिव राज्यमहासचीव इंजि.एम.ए.हकीम यांच्या नेतृत्वाखालील MEA च्या मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी आदरणीय किशोर राजे निंबाळकर साहेब, सदस्य सचिव, म.जी.प्रा. यांचा सत्कार करून आभार व ऋण व्यक्त करण्यात आले. ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश देशमुख आणि शहापूर तालुका सचिव अनिकेत रमेश धलपे ह्यांनी Maharashtra Engineers Asociation चे राज्य अध्यक्ष माननीय श्री प्रदीप पडोळे व महासचिव हकीम साहेबांचे ठाणे जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित अभियंत्या तर्फे आभार मानले.