जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी वैदेही वाढाण तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड

जनदूत टिम    21-Jul-2021
Total Views |
पालघर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली असून वैदेही वाढाण यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबरे यांची निवड झाली आहे.

hh001_1  H x W: 
  
आज दि.20/07/2021 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले आणि वैदेही वाढाण यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्वर सांबरे आणि महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाली.

hhh2_1  H x W:  
 
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांनी 7 जुलै 2020 रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 9 जुलै 2021 पासून समाजकल्याण सभापती विष्णू कडव अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते.