कोकण विभागीय आयुक्त व्हि.बी.पाटील यांनी सिडको ने बांधलेल्या पालघर येथील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पाहणी

जनदूत टिम    20-Jul-2021
Total Views |
पालघर : पालघर जिल्हयाच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी कोकण विभागीय आयुत व्हि.बी.पाटील यानी केली या पाहणीमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद ,पोलिस अधिक्षक प्रशासकीय इमारतीची पाहणी ,विविध विभागाची पाहणी केली त्यांनतर सिडकोच्या अधिकाऱ्या समेवत आढावा बैठक घेतली.
 
kokan44_1  H x
 
पाटील यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयास भागास भेट दिली सदर इमारतीची पाहणी केली. कोविड उपचार केंद्रला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या कोविड नियंत्रणा बाबत चर्चा केली. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट (पीएलसी) ची पाहणी केली.
 
जिल्हाधिकारी याच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सदर आढावा बैठकीत कोव्हीड, लाटेबाबत नियोजन, भुसंपादन प्रकल्प याबाबत या आढावा घेण्यात आला. कोव्हीडच्या तिसऱ्या संभावित लाटेसंदर्भात सर्वानी दक्षता घ्यावी असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त पाटील यांनी अधिकारी वर्गांना दिले .
 
या आढावा बैठीत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दतात्रेय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपस्थितीत होते.