गणेश चौधरींच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या रक्तानंद सेवा ग्रुपच्या अधिकृत लोगोचे उद्घाटन

जनदूत टिम    19-Jul-2021
Total Views |
शहापूर : धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव कु.गणेश धोंडू चौधरी यांच्या संकल्पनेतून रुग्णसेवेसाठी निर्मित झालेल्या व ग्राफिक्स डिझायनर गणेश वाघेरे यांच्या कलेतून साकारलेल्या रक्तदानंद सेवा ग्रुप च्या अधिकृत लोगोचे उद्घाटन धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सोमनाथ धिर्डे साहेबांच्या हस्ते वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी पत्रकार आशाताई पडवळ तळेकर, धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व प्रसिद्धी प्रमुख पंढरीनाथ ढमके, धर्मवीर युवा प्रतिष्ठान शहापूर तालुका उपाध्यक्ष जयवंत हरड, प्रतिष्ठान चे आसनगाव विभाग प्रमुख सलिम भाई शेख, ओमकार वरकुटे, मनिष जागरे तसेच धर्मवीर युवा प्रतिष्ठान व रक्तानंद सेवा ग्रुप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
blood5_1  H x W
 
कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी व आर्थिक पाठबळ नसतांना, आपल्या गरिबीची जाण ठेवत ठाणे - पालघर जिल्हा असो अथवा मुंबई - नाशिक सारख्या अनेक हॉस्पिटलमध्ये कोणाला मदत लागल्यास अनेकजण गणेश चौधरींशी संपर्क साधून हक्काने मदत मागत असतात. रुग्णांना व्हेंटिलेटर, नॉर्मल व icu बेड उपलब्ध करून देण्यापासून ते बिल कमी करण्यापर्यंत अनेक नामवंत हॉस्पिटल मधील संबंधित डॉक्टर, स्टाफ तसेच राजकीय - सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी व मित्रपरिवाराशी समनव्यय साधून गणेश चौधरी अगदी देवदूता प्रमाणे रुग्णांच्या व नातेवाईकांच्या मदतीसाठी रात्री - अपरात्री धाऊन येत असून त्यांना आधार देतात. आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना मायेचा आधार मिळाला आहे. एखाद्या लोक प्रतिनिधीलाही लाजवेल अस सामाजिक कार्य आज गणेश चौधरी करत आहेत. त्यामुळे गणेश चौधरींनी युवा वर्गासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून समाजसेवा करण्यासाठी फक्त पैसाच लागतो अस नाही तर मनाची जिद्द व मदत करण्यासाठी इच्छाशक्ती लागते हे सिद्ध करून दाखवलं आहे.
 
उत्तरमहाराष्ट्रातील रुग्णांसाठी देवाच मंदिर समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील एस एम बी टी हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल चे सर्वेसर्वा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉ सुधीर तांबे साहेब, हॉस्पिटल चे विश्वस्त डॉ हर्षल दादा तांबे यांच्या आशिर्वादाने व हॉस्पिटल चे लॉबी मॅनेजर डॉ सुरज कडलग सर यांच्या व हॉस्पिटल मधील विविध नामवंत डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या च्या सहकार्याने ग्रामीण भागातील अगदी आदिवासी खेड्यापाड्यातील रुग्णांच्या सेवेसाठी गणेश चौधरी सहजरीत्या उपलब्ध होत असून अनेक ऑपरेशन मोफत व अल्पदरात करून देण्यासाठी मदतही केली आहे. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन दरम्यान रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास गणेश चौधरींच्या माध्यमातून आत्तापर्यंत ८० हुन अधिक बॉटल रक्त रुग्णांना निशुल्क पणे उपलब्ध करून दिल आहे.
 
गणेश चौधरींच्या संकल्पनेतून रूग्णसेवेसाठी तयार केलेल्या रक्तानंद सेवा ग्रुप च्या माध्यमातून विविध ठिकाणी रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर राबवली जाणार असून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये रक्ताची आवश्यकता व मदत लागल्यास त्यांना धीर देण्याचा व मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार आहे. तसेच रूग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा तसेच त्यातून मिळणार आनंद व मदत केल्यानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावरील येणार स्मितहास्य हीच माझी खरी संपत्ती असे गणेश चौधरी यांनी सांगितले. तरुणांनी मोठ्या संख्येने या रक्तानंद सेवा ग्रुप मध्ये सहभागी होऊन जनसेवेस हातभार लावावा असे आवाहन सुद्धा केले आहे. गणेश चौधरींच सामाजिक कार्य पाहून सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रत्येक्ष - अप्रत्येक्षरीत्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.