महाराष्ट्र राज्य पञकार संघातर्फे नामफलक उद्घाटन व छञी वाटप कार्यक्रम

जनदूत टिम    18-Jul-2021
Total Views |
शहापूर : महाराष्ट्र राज्य पञकार संघ शहापूर व ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यामाने शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते मुबंई- नाशिक महामार्गावर नामफलक उदघाटन व जिल्हा परिषद शाळा आसनगाव येथे विद्यार्थ्यांना छञ्या वाटप कार्यक्रम विविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
 
shahapur58_1  H
 
महाराष्ट्र राज्य पञकार संघ नेहमीच समाजाप्रती आपली बांधिलकी जपत वर्षभर पञकार व समाजातील इतर घटकांसाठी नेहमीच कार्यक्रम राबवत असतो.शुक्रवार दि.१६ जुलै रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा आसनगाव येथे विद्यार्थ्यांना व पञकारांना छञ्या वाटप करण्यात आल्या तसेच महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्या नामफलकाचे उदघाटन आसनगाव व घाटनदेवी येथे करण्यात आले.
याप्रसंगी नामफलक उदाघटक म्हणुन आमदार दौलत दरोडा व मा.आमदार पांडुरंग बरोरा उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म.रा.पञकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे,म.रा.पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, जिल्हा कृषी सभापती संजय निमसे, इगतपुरी तहसीलदार परमेश्वर कशीले, उद्योजक अनिल मानीवडे, श्यामबाबा परदेशी, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, नागेश घुमरे, भास्कर जाधव, महेश धानके, योगेश हजारे, प्रहारचे तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे, सचिव नरेश पाटील, शहापूर तालुका अध्यक्ष सुनिल घरत, भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे, इगतपुरी तालुका अध्यक्ष पोपटराव गवांदे,भाजप शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वेखंडे, आधार प्रतिष्ठान चे नागेश घुमरे, तर आदीसह कार्यक्रमास पञकार संघाचे शहापूर, भिवंडी, कल्याण, ठाणे व इगतपुरी जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
खान्देशातुन कसारा घाट मार्गे मुंबईला येणाऱ्या , जाणाऱ्या पर्यटक, पत्रकार, प्रवाशी यांच्या स्वागताचे नामफलक लावण्याची पत्रकार संघाची संकल्पना आज साकार होत आहे. असे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले.
 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपक्रम प्रेरणादायी असून जिल्ह्यातील पत्रकारांनी याचे अनुकरण करायला हवे असे प्रतिपादन साराष्ट्रवादी कॉग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी आसनगाव येथे छत्री वाटपाच्या कार्यक्रमात केले.
ठाणे जिल्हात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दोन हजार वह्या वाटपाचा संकल्प सोडला असल्याची माहिती
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी आसनगाव जिल्हा परिषद शाळा क्रं १ व २ येथील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करताना दिली. सदर छत्रीचे वाटप प्राथमिक आरोग्यकेंद्र शहापूर, कसारा ट्रॅफिक पोलीस, भाजीविक्री करून पोट भरणाऱ्या आदिवासी महिला , शाळेय विद्यार्थी तर आदी ठिकाणी छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष सुनील घरत, सुभाष विशे, संजय भालेराव, प्रकाश अंदाडे, प्रकाश जाधव, संतोष चोणकर यांनी विशेष मेहनत घेतली.